Torna Fort Information In Marathi | तोरणा किल्ल्याची माहिती मराठीत 2025.

Torna Fort Information In Marathi.

तोरणा किल्ला

तोरणा किल्ला म्हणजेच “प्रचंडगड” किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. “प्रचंडगड” हे नाव प्रचंड ( विशाल ) आणि गड ( किल्ला ) यावरून आले आहे. पुणे शहरापासून जवळपास ६० किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये तोरणा किल्ला आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.Torna Fort Information In Marathi.

तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४६ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी आयुष्यात सर्वप्रथम जिंकलेला किल्ला होय. असे म्हटले जाते की राज्यांनी तोरणा जिंकून स्वराज्य रुपी मंगल कार्याचे जणू तोरणच बांधले होते. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव “तोरणा” पडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. तोरणा हा एक अतिशय अभेद्य असा गिरीदुर्ग आहे.Torna Fort Information In Marathi.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या किल्ल्यावरून आपल्याला लिंगाणा ,पुरंदर, सिंहगड ,रायगड, हे सर्व गडकोट पहावयास मिळतात.Torna Fort Information In Marathi.

तोरणा किल्ल्याची निर्मिती इसवी सन १४७० ते १४८६ या कालखंडात झाल्याचे पुरावे प्राचीन बखरींमध्ये पहावयास मिळतात. तोरणा किल्ल्याची समुद्रसपाटीपासून सर्वसाधारण उंची ही १४०३ मीटर म्हणजेच ४६०३ फूट इतकी आहे.
ज्यामुळे हा जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे. Torna Fort Information In Marathi.

इतिहास :

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये सर्वप्रथम तोरणा हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ सोळा वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून ‘प्रचंडगड’ असे ठेवले. Torna Fort Information In Marathi.

सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला, आभाळाला गवसणी घालणारा तोरणा किल्ला हा नेमका कुणी बांधला याचा स्पष्ट पुरावा इतिहासामध्ये उपलब्ध नाही. तोरणा किल्ल्यावर असलेल्या लेण्या आणि मंदिरांच्या अवशेषावरून हा किल्ला पूर्वी शैवपंथाचा एक आश्रम असावा असा अंदाज इतिहासकारांकडून लावला जातो. तोरणा किल्ला झुंजार माची तटबंदी हा किल्ला १३ व्या शतकात शिवपंथाने बांधला असे मानले जाते . मेंघाई देवी मंदिर, ज्याला तोरणाजी मंदिर असेही संबोधले जाते, ते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. मलिक अहमद या बहामनी शासकाने १४७० च्या उत्तरार्धात अलाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत हा किल्ला ताब्यात घेतला .

इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद जो बहामनी राजवटीशी संबंधित होता त्याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. निजामशाहीच्या राज्यामध्ये हा किल्ला अनेक वर्ष निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव शिवाजींनी ‘प्रचंडगड’ किल्ल्याचे तोरणा असे नामकरण केले आणि त्यामध्ये अनेक स्मारके व बुरुज बांधले. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये तोरणा किल्ल्याचा समावेश नव्हता. Torna Fort Information In Marathi.


छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत होते आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. ज्यावेळी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल अपेष्टा करून मारले त्यानंतर तोरणा हा किल्ला मुघलांच्या हाती गेला. 18व्या शतकात, शिवाजीपुत्र संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा तोरणा किल्ला परत मुघलांच्या ताब्यात गेला. छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे व सेवेकरी शंकराजी नारायण यांनी परत हा किल्ला स्वराज्यात आणला. स्वराज्यामध्ये येणारा हा पहिला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जणू सोबत धनलक्ष्मी घेऊन आला होता. या किल्ल्यावर गुप्तधनाच्या बऱ्याच राशी प्राप्त झाल्या . या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा व राजगड किल्ल्याच्या बांधणीसाठी केला. Torna Fort Information In Marathi.


पुढे इ. स. १७०४ मध्ये औरंगजेबाने तोरणा किल्याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. औरंगजेब सारख्या या क्रूर बादशहाने स्वराज्यातील सर्वच किल्ले हे फितुरी करून जिंकलेले होते ,मात्र तोरणा हा एकमेव असा किल्ला होता जो औरंगजेब सारख्या क्रूर मूत्सद्याने लढाई करून जिंकला होता. पण परत चार वर्षांनी इसवी सन १७०८ मध्ये स्वराज्यातील सरनोबत म्हणून ज्यांची ख्याती प्रसिद्ध होती असे स्वराज्यातील सरनोबत नागोजी कोकाटे यांनी शिताफीने तोरणा किल्ल्यावर आपली माणसे पाठवून तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला.Torna Fort Information In Marathi.

पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. Torna Fort Information In Marathi.

हे पण पहा : https://marathimavla.com/raigad-fort-information-in-marathi/#more-312

तोरणा किल्ल्यावर पाहण्यासाठी पर्यटक ठिकाणे :

  • बिनी दरवाजा :

तोरणा किल्ल्यावर जाताना जो पहिला दरवाजा लागतो तो बिनी दरवाजा आहे, विनी दरवाजा आत गेल्यानंतर व काही पायऱ्या चढल्यानंतर आपण पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचतो तो आहे तोरणा दरवाजा.

  • मेगाई देवीचे मंदिर :

तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवी मंदिर एक प्राचीन मंदिर आहे.
या मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या वेल्हा गावचे लोक नवरात्र मध्ये मेंगाई देवी च्या मंदिरासमोर उत्सव साजरा करतात. तोरणा किल्ला पाहण्यासाठी गेलेले पर्यटक, किल्लाप्रेमी हे मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये आराम करू शकतात. Torna Fort Information In Marathi.

  • झुंजार माची :

तोरणा किल्ल्यावरील दिंडी दरवाजाच्या खालच्या भागाला झुंजार माची पाहायला मिळते.
झुंजार माची पाहण्यासाठी तोरणा किल्ल्यावरील हनुमान बुरुजापासून, मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूने, दिंडी दरवाज्यातून झुंजारमाची पाहण्यासाठी जाता येते.
झुंजार माची वरून आपल्याला ,रायगड किल्ला ,लिंगाणा किल्ला, राजगड किल्ला, सिंहगड किल्ल ,पुरंदर किल्ला हे सगळे किल्ले झुंजार माजी वरून दिसतात.
पावसाळ्यामध्ये झुंजारमाची वर सर्वत्र दाट धुके पसरलेले असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जाणे धोक्याचे ठरू शकते. Torna Fort Information In Marathi.

  • तोरंजाई देवी मंदिर :

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत तोरणा किल्ला जिंकून घेतला.
जिंकलेल्या तोरणा किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कामगारांची नेमणूक केली.
तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना कामगारांना गडावरती २२ सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे सापडले. त्या ठिकाणीच छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरंजाई देवीचे मंदिर बांधून घेतले.
तोरणा किल्ल्यावर गेल्यानंतर कोठी दरवाजाच्या समोर एक छोटेसे मंदिर पाहायला मिळते. हेच ते तोरणजाई देवीचे मंदिर होय. Torna Fort Information In Marathi.

  • कोकाटे दरवाजा :

झुंजार माची वरून बुधला माचीकडे जाताना कोकाटे दरवाजा असा मोठा भक्कम दगडात कोरलेला दरवाजा लागतो.

  • बुधला माची :

तोरणा किल्ल्यावरील बुधला माचीची एक अनोखी रचना आहे. मराठीत बुधला म्हणजे पात्र. माचीचा आकार उलथून ठेवलेल्या तेलाच्या डब्यासारखा असतो. म्हणून नाव बुधला माची. या किल्ल्याला प्रचंडगड म्हणण्याचे एक कारण म्हणजे या बुधला माचीची भव्य रचना आहे असे मानले जाते.
बुधला माची कडे जाण्यासाठी कोकण दरवाजा लागतो.
तोरणा किल्ल्यावर किल्ल्याच्या पश्चिम भागाला बुधला माची आहे.
बुधला माची वरील पायरे दरवाजातून तोरणा किल्ला पाण्यासाठी सहजपणे जाता येते.
तोरणा किल्ल्यावरून राजगडावर जाण्यासाठी मुधलामाची वरील भगत दरवाजातून रस्ता आहे. या रस्त्याने आपण तोरणा किल्ला पार करून राजगड किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो.

  • तोरनेश्वर मंदिर :

तोरणा किल्ल्यावर पूर्वी महादेवाला समर्पित तोरणेश्वराचे मंदिर होते.
तोरणा किल्ल्यावरील मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूला हे तोरणेश्वराचे मंदिर असल्याचे सांगितले जाते.
आज त्या ठिकाणी त्या मंदिराचे भग्न अवशेष आहेत.

तोरणा किल्ल्यावर कसे जावे :

पुण्याहून तोरणा किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :

तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे आहे, पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे. तोरणा या किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने प्रथम वेल्हे या गावाच्या पायथ्याशी यावा लागते.
पुण्यातील स्वरागेट या बस स्थानक वरून राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत. पुणे स्वारगेट वरून तुम्हाला दीड ते दोन तासांमध्ये वेल्हे गावात पोहोचता येईल, बस तुम्हाला तोरणा किल्ल्यापाशी सोडते तिथून पुढे तुम्ही तोरणा किल्ला हा पायरी मार्गाने जाऊ शकतात. शक्यतो किल्ला सर करण्यासाठी सकाळी चढाई सुरू केली तर उत्तमच
पुणे स्वारगेट – नसरापूर – वेल्हे,
पुणे स्वारगेट – पानशेत – वेल्हे
पुणे स्वारगेट – खानापूर – पाबे मार्गे वेल्हे येथे जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. ती बस तुम्हाला तोरणा किल्ल्यापाशी सोडते तिथून पुढे तुम्ही तोरणा किल्ला हा पायरी मार्गाने जाऊ शकतात.

पुणे स्वारगेट – वेल्हे, महाराष्ट्र राज्य परिवहन बसचे वेळापत्रक :

पुणे स्वारगेट – वेल्हे.
सकाळी – ६:१५ , ७:३०, ८:००, ८:३० , ९:३० , १०:०० , ११:१५ , ११:४५.

अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते. दुसरा मार्ग वेल्ह्यापासून ५ कि.मी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. गावाच्या पश्चिमेकडून वाळणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाट जाते. या वहिवाटीच्या वाटांशिवाय चोरवाटेने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे.

हे पण पहा : https://marathimavla.com/rajgad-fort-information-in-marathi/#more-351

मुंबईहून तोरणा किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :

मुंबईवरून तोरणा किल्ल्याला जाण्यासाठी प्रथम ट्रेनने किंवा बस पकडून पुण्याला यावे.
पुणे येथून स्वारगेट वरून बस पकडून वेल्हे येथे जावे, व नंतर वेल्हे येथून तोरणा किल्ला चढावा.
मुंबई-पुणे-वेल्हे हा मार्ग मुंबईहून तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे.

FAQs :

१. तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
– तोरणा किल्ला “पुणे” जिल्ह्यात आहे.

२. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ?
– छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला “तोरणा किल्ला” आहे.

३. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले ?
– छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून “प्रचंडगड” आसे ठेवले.

४. पुण्यापासून तोरणा किल्ल्याचे अंतर किती आहे ?
– पुण्यापासून तोरणा किल्ल्याचे अंतर ६० किलोमीटर इतके आहे.

५. तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे ?
– तोरणा किल्ला, कानद नदीच्या खोऱ्यात आहे.

६. कोणत्या किल्ल्याला “गरुडाचे घरटे” आसे म्हणतात ?
– पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ला गरुडाचे घरटे आसे म्हणतात.

हे पण पहा : https://marathimavla.com/shivneri-fort-information-in-marathi/#more-243

hostinger is best website for bye domain for your website. https://www.hostinger.in