Harihar Fort Information In Marathi.
हरिहर किल्ला.
हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. गिरिदुर्ग प्रकारात मोडणाऱ्या हरीहर किल्ल्याची उंची ही साधारण ३६७६ फूट इतकी आहे.
हरिहर किल्ला हा नाशिक शहरापासून ४२ किमी अंतरावर हर्षवाडी गावाजवळ सह्याद्रीच्या मध्यभागी वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्या भागात अंजनेरी, घनगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. वैतरणा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या हरीहर किल्ल्याला चौफेर बेलाग असा कातळकडा आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर हा किल्ला त्रिकोणी आकाराचा भासतो. Harihar Fort Information In Marathi.
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी – डोलबारी रांग, अजंठा – सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्या गोंडा घाटामधून जाणारा व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी “हरीहरगड” यांची उभारणी करण्यात आली होती. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला त्याच्या विलक्षण दगडी पायऱ्यांमुळे आपले वेगळेपण जपतो. हरिहर किल्ला चढण्यासाठी चित्तथरारक अनुभव देणारा असून, किल्ला चढणीच्या खडक कोरून केलेल्या पायऱ्या ह्या ८० अंशात आहेत. हरीहर किल्ल्याला कातळ कोरलेल्या अंदाजे 125 च्या आसपास दगडी पायऱ्या आहेत. हा किल्ला ट्रेकिंगसाठी थोडा अवघड आहे.
हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. या तलावात वर्षभर स्वच्छ पाणी असते. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते.या किल्ल्यावर एक छोटा राजवाडा आहे. तुम्ही इथे राहू शकता. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. Harihar Fort Information In Marathi.
हरीहर किल्ल्याचा इतिहास :
नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला, या किल्ल्याला आपण हर्षगड म्हणून देखील ओळखतो, साधारण ९ व्या ते १४ व्या शतकात यादवांनी हरीहर हा किल्ला बांधला. यादव राजवटीने या किल्ल्यावर राज्य केले. बहमनी सल्तनत, मुघल राज्यकर्ते यांच्यासह विविध राज्यकर्त्यांनी हरिहर किल्ला ताब्यात घेऊन आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हरिहर हा किल्ला मराठा साम्राज्याचा ताब्यात देखील होता. हरीहर किल्ल्याने आपले मोक्याचे स्थान मजबूत केल्याने या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक लढायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नाशिक प्रदेशात लक्ष ठेवण्यासाठी हरीहर किल्ला हा अनेक राजवटीमध्ये महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. हरिहर किल्ला हा यादवांनी मुख्यतः गोंडा घाटातील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी उभारला असल्याचे सांगितले जाते. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांसह अनेक राजवटींनी हरीहर किल्ल्यावर आक्रमणे करण्याचा प्रयत्न केला.
अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता.
१६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हा देखील किल्ला जिंकून घेऊन तो आपल्या स्वराज्यात आणला. मात्र नंतर शहाजी राज्यांकडून हरीहर किल्ला मुघलांनी आपल्या ताब्यात घेऊन, त्यावर वर्चस्व गाजवले.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात सामील करून घेऊन मोलाची भर घातली.
पुढे ८ जानेवारी १६८९ रोजी मुघल सरदार मातब्बरखान याने हरीहर किल्ला जिंकला.
शेवटी इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला.
१८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात”. खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. Harihar Fort Information In Marathi.
भारत स्वतंत्र झाल्यापासून हरीहर किल्ला हा भारत सरकारच्या ताब्यात आहे.
इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, हा किल्ला हर्षगड नावाने ओळखले जाते. Harihar Fort Information In Marathi.
हे पण पहा : हरिश्चंद्रगड किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/harishchandragad-fort-information-in-marathi/#more-702
हरिहर किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
१. देव : या ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी शेंदूर फासून ठेवलेले अनगड देव आपणास दिसतील. त्यांच्या मध्यभागी एक त्रिशूळही रोवून ठेवलेला असून हा अनामिक देवतांचा चवथरा येथून जाणा-या-येणा-यांचे लक्ष वेधून घेतो.
२. काळ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या : किल्ल्याच्या अजस्र अशा काळ्या डोंगरा समोर येतो. हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्याच्या पायऱ्या यांच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरश: गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणास स्वर्गारोहणाचा अद्भुत अनुभव देईल, याबद्दल मनात तिळमात्र शंका उरत नाही. काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पायऱ्या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी. Harihar Fort Information In Marathi.
३. पहिले प्रवेशद्वार : हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात.
४. गणरायाची मूर्ती : गडाच्या या प्रवेशद्वारा शेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल.
५. दरवाजे आणि पायऱ्या : कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर परत साधारण १३० पायऱ्या यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूससुद्धा हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा
६. गुहा : हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे. पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे वरूनच ही गुहा पाहून पुढे जावे. Harihar Fort Information In Marathi.
७. सदरेचे अवशेष : गडाच्या सदरेची पूर्णपणे पडझड झालेले आपल्याला दिसते, गडाच्या सदरेचे अवशेष आपणास दिसतात.
८. पाण्याची टाकी व तलाव : पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेला हा तलाव आपल्याला दिसते.
९. देऊळ : तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी आपणास दिसेल.
१०. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा : पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी आपण शेवटचा कातळटप्पा चढून पार करायची. येथे माथ्यावर पोहोचताच अगदीच छोटया सपाटीवर देवांची दाटी दिसते. या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.
११. दगडी कोठीत : खाली उतरून समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशा या दगडी कोठीत जावे. कोठीचा प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. Harihar Fort Information In Marathi.
हे पण पहा : मुरूड-जंजिरा किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/murud-janjira-fort-information-in-marathi/#more-824
हरिहर किल्ल्याचे छायाचित्र :
पोहोचण्याच्या वाटा :
पुण्याहून हरिहर किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :
बस : हरिहर किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही. वाकडेवाडी(पुणे) – नाशिक एसटी बसने नाशिकला जावे.
वाकडेवाडी(पुणे) – भोसरी – मोशी – चाकण – राजगुरूनगर – मंचर – नारायणगाव – आळेफाटा – संगमनेर – सिन्नर – नाशिक. नाशिकच्या बसस्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची. त्या बसने आपण उतरायचे मात्र निरगुडपाडा गावात. बसमधून पायउतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर ऊर्फ हर्षगडचा वैशिष्टयपूर्ण डोंगर दिसतो. तेथून अगदी मळलेल्या वाटेने आपण तासाभरात हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो.
रेल्वे : पुणे स्टेशन वरून नाशिक पर्यंत रेल्वेने जाऊ शकतो. थेट हरिहर किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही. त्यामुळे शेवटी तुम्हाला एसटी बसने जावे लागेल.
खाजगी वाहन : मित्रांनो, हरिहर किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
पुणे – भोसरी – मोशी – चाकण – राजगुरूनगर – मंचर – नारायणगाव – आळेफाटा – संगमनेर – सिन्नर – नाशिक – त्रंबकेश्वर रोड – त्रंबक – हरिहर किल्ला रोड – हरिहर किल्ला.
मुंबईहून हरिहर किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :
बस : हरिहर किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही. मुंबई – नाशिक एसटी बसने नाशिकला जावे.
मुंबई – ठाणे – नाशिक. नाशिकच्या बसस्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची. त्या बसने आपण उतरायचे मात्र निरगुडपाडा गावात. बसमधून पायउतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर ऊर्फ हर्षगडचा वैशिष्टयपूर्ण डोंगर दिसतो. तेथून अगदी मळलेल्या वाटेने आपण तासाभरात हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो.
रेल्वे : मुंबई स्टेशन वरून नाशिक पर्यंत रेल्वेने जाऊ शकतो. थेट हरिहर किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही. त्यामुळे शेवटी तुम्हाला एसटी बसने जावे लागेल.
खाजगी वाहन : मित्रांनो, हरिहर किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
मुंबई – ठाणे – पडघा – शहापूर – कसारा – खोडाळा – हर्ष रोड – निरगुडपाडा – जांभूळवाडी – हर्षवाडी – हरिहर किल्ला रोड – हरिहर किल्ला
नाशिकहून हरिहर किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :
बस : नाशिकच्या बसस्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची. त्या बसने आपण उतरायचे मात्र निरगुडपाडा गावात. बसमधून पायउतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर ऊर्फ हर्षगडचा वैशिष्टयपूर्ण डोंगर दिसतो. तेथून अगदी मळलेल्या वाटेने आपण तासाभरात हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो.
खाजगी वाहन : मित्रांनो, हरिहर किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
नाशिक – त्रंबकेश्वर रोड – त्रंबक – हरिहर किल्ला रोड – हरिहर किल्ला.
हे पण पहा : रायगड किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/raigad-fort-information-in-marathi/#more-312
FAQs :
१. हरिहर गड कुठे आहे ?
हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
२. हरिहर किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे ?
चढण्यासाठी चित्तथरारक खडक कोरून केलेल्या पायऱ्या ह्या 80 अंशात आहेत.
३. हरिहर किल्ला का बांधण्यात आला होता ?
गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.
४. हरिहर किल्ला चढायला किती वेळ लागतो ?
पायऱ्यांच्या मार्गाने हरिहर किल्ला चढण्यासाठी १ ते १.५ तास लागतात. हर्षेवाडी गावातून चढण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
५. हरिहर फोर्ट ट्रेकवर कॅम्पिंगला परवानगी आहे का ?
हरिहर किल्ला ट्रेक दरम्यान कॅम्पिंगवर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, गडाच्या माथ्यावर तंबू ठोकायला फारशी जागा नाही. पायऱ्या सुरू होण्यापूर्वी तुम्ही पठारावर तळ देऊ शकता. तेथे पुरेशी जागा उपलब्ध आहे. ते गावापासून जवळ आहे, त्यामुळे अन्न आणि पाणी मिळणे सोपे होते.
६. हरीहर किल्ला कुठे आहे ?
हरिहर किल्ला हा नाशिक पासून 60 किलोमीटर आणि इगतपुरी पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगेत मध्यभागी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हरीहर किल्ला असून, निरपूडपाडा आणि हर्षवाडी हे हरीहर किल्ल्याच्या पायथ्याचे गावे आहेत.
हे पण पहा : सिंहगड किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/sinhagad-fort-information-in-marathi/#more-596
हे पण पहा : तोरणा किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/torna-fort-information-in-marathi/#more-416
Hostinger Is Best Website For Bye Domain For Your Website. https://www.hostinger.in