Harishchandragad Fort Information In Marathi | हरिश्चंद्रगड किल्ल्याची माहिती मराठीत 2025.

Harishchandragad Fort Information In Marathi.

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर म्हणजेच हरिश्चंद्रगड. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. हरिश्चंद्रगड हा किल्ला अहमदनगरपासून १२५ कि.मी. अंतरावर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असून, हरिश्चंद्रगड समुद्रसपाटी पासून ४६९१ फूट उंचीवर आहे. परंतु त्याच प्रमाणे किल्ल्यात विष्णू आणि गणेशाची अनेक मंदिरे आहेत. आजूबाजूच्या प्रदेशाचे रक्षण आणि नियंत्रण करण्यात हरिश्चंद्रगडाची प्रमुख भूमिका आहे. Harishchandragad Fort Information In Marathi.

हरिश्चंद्र गडावर हरिश्चंद्रेश्वर देवाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते.हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. या घळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी असले तरी सभोवती प्रदक्षिणा मारता येते. Harishchandragad Fort Information In Marathi.

मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.

Harishchandragad Fort Information In Marathi.

हरिश्चंद्रगडाचे पौराणिक महत्त्व :

हरिश्चंद्रगड हा किल्ला खूप प्राचीन असून मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यांसारख्या विविध पुराणांमध्ये (प्राचीन धर्मग्रंथ) हरिश्चंद्रगडाचा उल्लेख सापडतो. नागेश्वर (खिरेश्वर गावातील), हरिश्चंद्रेश्वर मंदिरात आणि केदारेश्वराच्या गुहेतील कोरीव कामावरून हा किल्ला मध्ययुगीन काळातील असल्याचे सूचित होते. किल्याची उत्पत्ती ६ व्या शतकात, कलाचुरी राजघराण्याच्या काळात झाल्याचे म्हटले जाते. याच काळात हरिश्चंद्रगड हा किल्ला बांधला गेला. १० व्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर एक हे शिवालय आहे. Harishchandragad Fort Information In Marathi.

विविध लेण्या बहुधा ११ व्या शतकात कोरल्या गेल्या असतील. या लेण्यांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत. मोगल व मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. १४ व्या शतकात महान ऋषी चांगदेव महाराज येथे ध्यान करीत असत. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत महान ऋषी चांगदेव महाराजांनी  तपश्चर्या केली होती.चांगदेव महाराजांनी  तत्वसार महाकाव्य निर्माण केले. Harishchandragad Fort Information In Marathi.

हरिश्चंद्रगडाचा इतिहास : (History of Fort Harishchandragad)

  हरिश्चंद्रगड या किल्ल्याचे बांधकाम कधी केले गेले, हे सांगता येत नाही. इ.स. बाराव्या-तेराव्या शतकात येथे योगी चांगदेव वास्तव्यास असावेत, असे मानले जाते. चांगदेवच्या तत्त्वसार ग्रंथाच्या एका ओवीत शके १२३४ मधे हरिश्चंद्रगडावर हा ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात दाखल झाला. सभासद बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख मिळतो. पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. Harishchandragad Fort Information In Marathi.

१७४७–४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली होती. या किल्ल्याच्या खर्चासाठी २० गावांचे उत्पन्न लावून देण्यात आलेले होते. शाहू रोजनिशीत सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. पुढे १७७५-७६ मध्ये या किल्ल्याचा हवालदार म्हणून संताजी सावंत याची नेमणूक केलेली तत्कालीन कागदपत्रांतून आढळते. इंग्रजी सैन्यातील अधिकारी कर्नल साईक्सच्या फौजेने मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात मे १८१८ हा किल्ला जिंकला. नंतर इ.स. १४ जून १८१८ अहमदनगरचा जिल्हाधिकारी (कलेक्टर) हेन्री पॉटींजर याच्या हुकमानुसार तत्कालीन शिवनेर तालुक्याचा कमाविसदार रामराव नरसिंह याने बोइट याच्या ताब्यात हा किल्ला दिला. Harishchandragad Fort Information In Marathi.

पुढे १८ डिसेंबर १८१८ मधे हा किल्ला पाडण्यासाठी कॅप्टन इस्टनर या भागात आला. त्याने किल्ल्यावर जाणारे रस्ते, पाण्याची टाकी, तटबंदी उद्ध्वस्त केली. मात्र त्याने हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर व लेण्यांना धक्का लावला नाही. किल्ल्याच्या कोकणकड्यावरून अतिशय दुर्मीळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य ज्याला इंद्रवज्र म्हणतात, ते दिसल्याची नोंद कॅप्टन साईक्स या इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवली आहे.

हरिश्चंद्रगडाचे गडाचे वर्णन :

पावसाळ्यात या गडाचे सौदर्य खुप सुंदर असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणिवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात.किल्ल्याच्या सर्वोच्च बिंदूला तारामती शिखर किंवा तारामाची असे म्हणतात व बिंदू जवळच्या परिसराचे आणि वनक्षेत्राचे एक सुंदर विहंगम दृश्य प्रदान करते. या किल्ल्याला महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. कोकण कडा किंवा कोकण खडक ही अर्धवर्तुळाकार दगडी भिंत आहे. Harishchandragad Fort Information In Marathi.

  तारामती य गडाचे सर्वोच्च शिखरावरून कळसुबाई, रतनगड, आजोबा,  भैरवगड, कुलंग, अलंग, मदन असा उत्तरेकडील, तर माळशेज घाट, भैरवगड, नानाचा अंगठा, जीवधन यांपर्यंतचा दक्षिण- पश्चिमेकडील मुलूख दृष्टिक्षेपात येतो. अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.

हरिश्चंद्रगडा वरील पहाण्याची ठिकाणे :

टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. शिखराच्या पायथ्याशी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.

१. हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :

कुंडाच्या पश्चिमेला ‘हरिश्चंद्रेश्वराचे’ हेमाडपंती बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिर असून पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या पायऱ्यायुक्त कळसापर्यंत आकर्षक व शैलीदार कोरीव काम केलेले आहे. मंदिराला प्रासाद व त्यामध्ये जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त भिंत आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन गुहा आहे.गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. सांप्रत मंदिराच्या प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची बरीच पडझड झालेली आहे. असून त्यांतील एका गुहेच्या तळघरात  एक खोली आहे, यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ’चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तपश्चर्येला बसले होते व स्थानिक गावकर्‍यांची श्रध्दा आहे. Harishchandragad Fort Information In Marathi.

‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा ।

मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ।।

हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।

सुरसिध्द गणी विरुयातु । सेविजे जो ।। हरिश्चंद्र देवता ।।

मंगळगंगा सरिता ।सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।

ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु ।

लिंगी जगन्नाथु ।महादेओ ।।

जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति ।

आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा।।’

हे चांगदेवा विषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर, भिंतींवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ’तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर,

चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ।।

अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबार्‍यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.

२. केदारेश्वराची गुहा :

‘हरिश्चंद्रेश्वर’ मंदिराच्या उत्तरेला थोडे खालील बाजूस मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, ‘केदारेश्वराचे लेणे’यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. भव्य गुंफा असून या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे पाण्याने वेढलेले चौथऱ्यावर भव्य शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर छताला आधार देणारे खांब असून त्यांपैकी तीन खांब तुटलेले आहेत.ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्यस्थितीला एकच खांब आहे. चार खांब – चार युगांचे प्रतीक आहे. याच गुहेत एक खोली ही आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते. Harishchandragad Fort Information In Marathi.

३. तारामती शिखर :

तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची साधारणत ४८५० फूट आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारामती शिखराच्या खालील बाजूस खडकात कोरलेल्या आठ-नऊ लेण्या आहेत. यातील एका गुहेच्या द्वारपट्टीवर शिव आणि गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या असून गुहेत असणाऱ्या शिलालेखावरून या गुहा दहाव्या–अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात, तसेच येथील लेणी हिंदू लेणी असावीत, असे अभ्यासकांचे मत आहे.

या लेणी समूहातील एक अर्धवट कोरलेल्या गुहेत सुमारे साडेआठ फूट उंचीची गणपतीची महाकाय सुंदर मूर्ती कोरलेली आहे.याच गणेश गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा आहेत. या लेण्यांच्या थोडे खाली उत्तरेला एक कुंड असून त्याला ‘सप्ततीर्थ’ म्हणून ओळखले जाते. कुंडांत चौदा देवळ्या असून त्यात विष्णुमूर्ती ठेवलेल्या होत्या. यांतील काही विष्णुमूर्ती आज अस्तित्वात नसून उरलेल्या मंदिरामागील गुहेमधे ठेवलेल्या आहेत. कुंडासमोर ‘काशितीर्थ’ नावाने ओळखले जाणारे एक छोटे मंदिर आहे. मंदिरासमोर काही अपूर्ण शिल्प आहेत.

  गणेश गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाइनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात. Harishchandragad Fort Information In Marathi.

४. कोकणकडा :

गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारण ४५०० फूट भरते. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू ‘U’ या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.  संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.

  कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साइक्सला येथे “इंद्रव्रज” दिसल्याची नोंद आहे. इंद्रव्रज म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. येथील निसर्गसौंदर्यावर लुब्ध होऊन एका तरुणाने या कड्यावरून उडी घेतली त्याच्या नावाची संगमरवरी पाटी येथे आहे. Harishchandragad Fort Information In Marathi.

५. कोकणकड्याला पडलेली धोकादायक भेग :

हरिश्चंद्रगडावरील या प्रसिद्ध कोकणकड्याच्या माथ्यावर मोठी भेग पडली असून, त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे. या भेगेची तातडीने दुरुस्ती न केल्यास कड्याचा वरचा काही भाग येत्या काही दिवसांत कोसळण्याची शक्यता आहे. पर्यटकांना कड्याच्या टोकाचा हा भाग लोंबणारा (पुढे आलेला) असल्याची कल्पना असतेच असे नाही. हा भाग कोसळल्यास कोकणकड्याच्या सौंदर्यालाच तडा जाणार आहे.

  कड्याच्या टोकापासून सुमारे पाच ते दहा फूट अंतरावर भेग असून, येथील खडकाचा भाग आतून पोखरला गेला आहे. कोकणकड्यावर सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दरीतून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा वेगही प्रचंड असतो. ऊन, वारा, पाऊस यामुळे ही भेग रुंदावण्याची शक्यता आहे. Harishchandragad Fort Information In Marathi.

हे पण पहा : सिंहगड किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/sinhagad-fort-information-in-marathi/#more-596

हरिश्चंद्रगडावर कसे पोहोचायचे : (How to reach Harishchandragad Fort)

ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमा जिथे एकत्र येतात तिथे हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगड ट्रेकला अनेक मार्ग आहेत. ३ वेगवेगळ्या गावातून संपर्क साधता येतो. ते खिरेश्वर, पाचनई आणि वाळिवळे/बेलपाडा गावातील आहेत.

१. ठाणे जिल्ह्यातून :

बस : कल्याणहून नगरसाठी बस धरून ‘खुबी फाटा’ येथे उतरावे लागते. तेथून बसने किंवा खाजगी वाहनाने खिरेश्वर गावात आपण पोहोचतो. हे गाव किल्ल्याच्या पायथ्यापासून ७ किमी अंतरावर आहे.

मोटारसायकल – गाडी : ठाणे – पडघा – वासिंद – शहापूर – आटगाव – कालांगाव – खर्डी – कसारा – इगतपुरी – घोटी बुद्रुक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – घोटी-सिन्नर रोड – भंडारदरा फाटा – धामणी – वसाळि – तेरुंगण फाटा – अम्बीत – पाचनई.

२. पुणे जिल्ह्यातून :

बस : शिवाजीनगर एसटी स्टँड (पुणे) येथून खिरेश्वर गावासाठी दररोज बस आहे तेथून गावात पोहोचता येते.

मोटारसायकल – गाडी : पुणे – भोसरी – मोशी – चाकण – राजगुरूनगर – मंचर – नारायणगाव – ओतूर – ब्राम्हणवाडा – करंदी फाटा – कळंब फाटा – पीशेवाडी – भोलेवडी – कोतुळ – सोमलवाडी – लव्हळि ओतूर – पाचनई .

३. अहमदनगर जिल्ह्यातून :

अहमदनगर वरून  अकोला जाणारी बस पकडावी नंतर अकोला बस स्टॅन्ड वरून राजूर ला जाणारी बस पकडावी नंतर राजूर बस स्टॅन्ड वरून पाचनई बस पकडावी वेळ (९:४५am , ४:१५pm) फक्त २ बस आहेत.(राजूर ते तोलार खिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. ही वाट राजूर, अंबीत, पाचनई, मुळा नदीचे खोरे, घनचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ एक तासात तोलारखिंडीत पोहचते.)

मोटारसायकल – गाडी : अहमदनगर – राहुरी – लोणी – संगमनेर – अकोले – राजूर – हरिश्चंद्रगड चेकपॉईंट – लव्हली कोतुळ – पाचनई .

राजूर वरून : पाचनई गावात जाण्यासाठी बस पकडावी वेळ (९:४५am , ४:१५pm) फक्त २ बस आहेत. किंवा खाजगी वाहनाने जावे लागते. इथून वाट सरळ सर्वात वरच्या बिंदूकडे जाते.

अलीकडेच राजूर ते कोथळे (तोलार खिंड) हा मार्ग उपलब्ध झाला आहे. तोलार खिंड (तोलार दरी) पासून  सुमारे २-३ तास चालत जावे लागते.

कोतुळ येथून :  तोलार खिंडीपर्यंत बसची सुविधा उपलब्ध आहे. दर तासाला कोथळेकडे जाणाऱ्या बस, खासगी वाहनेही या मार्गावर उपलब्ध आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा :

गडावर जाण्यासाठी सध्या तीन चार वाटा प्रचलित आहेत. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.

१. पाचनईकडील वाट :

हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे.

पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे १.५ – २ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई गाव उंचावर असल्याने येथून गड गाठायला जास्त कष्ट पडत नाहीत. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ४ कि.मी. आहे.

हल्लीच राजूर ते तोलार खिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. ही वाट राजूर, अंबीत, पाचनई, मुळा नदीचे खोरे, घनचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ एक तासात तोलारखिंडीत पोहचते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात गडावरील मंदिरात पोहचता येते. पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणाऱ्या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. Harishchandragad Fort Information In Marathi.

२. खिरेश्वरकडील वाट :

जुन्नर तालुका/पुणे जिल्हातुन खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात. मुंबई-जुन्नर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. पुण्याहून आळेफाटामार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबीफाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते.

हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्‌टिका बसवलेली आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रती, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर’ असेही म्हणतात. Harishchandragad Fort Information In Marathi.

खिरेश्वर या गावातून दोन वाटा गडावर जातात.

१) एक वाट ही तोलार खिंडीतून सुमारे ३ तासात गडावरील्र मंदिरापर्यंत पोहचवते.

२) दुसरी वाट ही गडावरील जुन्नर दरवाजाला पोचते. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.

३. नळीची वाट :

नळीची वाट बेलपाड्यातून(मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा) हरिशचंद्रगडावर जाते. या वाटेने जाताना तब्बल दहा-बारा तासांचा प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लाइंब) समावेश असलेला खडतर मॅरेथॉन ट्रेक करावा लागतो.ही वाट अतिशय खडतर असून वाटेत भलेमोठे दगड आहेत नळीची वाट चढण्यासाठी सोबत दोर असणे आवश्यक आहे.चार किमीचा व १००० फूट उंच ४० अंश कोनात ट्रेक करावा लागतो.

४. तोलार खिंड :

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी ‘यू’ आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील दुवा आहे. येथे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास आजही दैदिप्यमान आहे.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.

५. सावर्णे-बेलपाडा-सायले असा घाटमार्ग :

हरिश्चंद्रगड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-सायले असा घाटमार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. येथून `बेलपाडा’ या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या साहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच `नळीची वाट’ असेही म्हणतात. Harishchandragad Fort Information In Marathi.

हे पण पहा : लोहगड किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/lohagad-fort-information-in-marathi/#more-555

हरिश्चंद्रगडाचे छायाचित्र :

FAQs :

१. हरिश्चंद्रगड कुठे आहे ?
हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.


२. हरिश्चंद्र किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
हरिश्चंद्र किल्ला हा भारतातील अहमदनगर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे.


३. हरिश्चंद्रगड ट्रेक किती लांब आहे ?
ट्रेकची लांबी: अंदाजे ६ किमी . ट्रेकचा कालावधी: एका दिशेने ३ तास. ठिकाण पत्ता: पाचनई गाव, कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य, महाराष्ट्र.


४. कोकण कडा कुठे आहे ?
कोकणकडा- हरिश्चंद्रगड व्हाया कडेेश्वर ट्रेल हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सर्वात आव्हानात्मक ट्रेकपैकी एक आहे. सर्व प्रकारच्या गिर्यारोहकांसाठी विविध साहसांचा आनंद घेणारा हा एक लोकप्रिय ट्रेक आहे. कोकणकडा येथून कोकण प्रदेश दिसतो, म्हणूनच हे नाव पडले.

हे पण पहा : तिकोना किल्ल्याची माहिती मराठी. https://marathimavla.com/tikona-fort-information-in-marathi/#more-471

Hostinger Is Best Website For Buy Domain For Your Website. https://www.hostinger.in