Lohagad Fort Information In Marathi | लोहगड किल्ल्याची माहिती मराठीत 2025.

Lohagad Fort Information In Marathi.

लोहगड

गडकोट ही स्वराज्याची संपत्ती होय. गडकोटांच्या ऐतिहासिक माहितीच्या या लेखमालेमध्ये आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण लोहगड या महत्त्वपूर्ण किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत…

लोहगड हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. लोहगड किल्ला पुणे शहरापासून सुमारे ५२ किलोमीटर अंतरावर आहे. लोहगड या भव्य किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. लोहगड किल्ला हा सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक किल्ला आहे. लोहगड किल्ल्याची उंची ही जवळपास ३४०० फूट उंच आहे. लोणावळा शहरापासून जवळच असलेला हा किल्ला मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता. लोहगडाचे अनेक मनमोहक पैलू आहेत. त्यापैकीच एक म्हणजे किल्ल्याची प्रभावित करणारी वास्तुकला आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. तटबंदी, बुरुज, दरवाजे हे प्राचीन वस्तूकलेचे बुलंद पुरावे आहेत. तसेच लोणावळा शहरापासून जवळच आहे आणि ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.

लोहगड हा किल्ला बहुतांश कालावधी मराठा साम्राज्याखाली होता, तर पाच वर्षे मुघलांच्या ताब्यात असल्याने या किल्ल्याने अनेक लढाया तसेच अनेक राज्यांचे उदय पतन पाहिले आहे. Lohagad Fort Information In Marathi.

किल्ल्यावरील मंदिरातील उत्कृष्ट आणि किचकट असे कोरीव काम हे प्राचीन अभियांत्रिकी कौशल्याचा पुरावाच देतात.लोहगड किल्ल्यावरील बांधकाम हे विविध कालखंडातील स्थापत्य शैलीने मिश्रित असल्याचे बघायला मिळते.भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. Lohagad Fort Information In Marathi.

लोहगड किल्ल्याचे भौगोलिक स्थान :

लोहगड हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.लोणावळ्याच्या अगदी जवळचे मळवली स्टेशन पासून जवळच, दुर्ग रांगेतील प्रमुख किल्ला म्हणजे लोहगड किल्ला होय. लोहगड किल्ला हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेत, मावळ प्रांतात इंद्रायणी नदी आणि पवना नदी या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये विभागला गेला आहे.लोहगड किल्ल्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर किल्ला अथवा संबळगड. लोहगड किल्ल्यावरून पवना धरणाचे मनमोहक, सुंदर दृश्य पर्यटकांना दिसते. पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग उर्फ कठीणगडही येथेच आहे. नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे. Lohagad Fort Information In Marathi.

लोहगड किल्ल्याचा इतिहास :

लोहगड किल्ला इ.स.२००० पूर्वी बांधला गेला असावा,
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. शेकडो वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेल्या या लोहगडाने सातवाहन, चालुक्य, यादव,मराठे, मुघल या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. Lohagad Fort Information In Marathi.

निजामशाही आणि आदिलशाही : इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमद याने निजामशाहीची स्थापना केली आणि निजामशाहीची सुरुवात झाली. याच काळात निजामशाहीचा विस्तार करताना मलिक अहमद याने अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय. पुढे इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या लोहगड किल्ल्यावर कैदेत कैदी म्हणून होता. सोळाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या शेवटी म्हणजे इ.स. १६३० मध्ये लोहगड किल्ला आदिलशहाने जिंकून घेतला आणि किल्ला आदिलशाहीत आणला. Lohagad Fort Information In Marathi.

मराठा साम्राज्य : स्वराज्य स्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा झपाट्याने विस्तार करत असताना, इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि विसापूर किल्ल्यासह लोहगड हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला आणि लोहगडावर स्वराज्याची पताका फडकू लागली. मात्र मोगलांसह लढाई होत असताना आपल्या सैन्याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करण्याचे ठरविले. Lohagad Fort Information In Marathi.

पुरंदरचा तह : इ.स. १६६५ साली राजा मिर्झा जयसिंग यांच्या सोबत जो पुरंदरचा तह झाला;या पुरंदरच्या तहात शिवरायांनी स्वराज्यातील २३ किल्ले तहाच्या कलमानुसार मुघलांच्या ताब्यात दिले होते. त्यात लोहगड किल्ल्याचा देखील समावेश होता. ५ वर्षे मुघलांच्या ताब्यात असणारा लोहगड, शिवरायांनी पुन्हा १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत स्वराज्यात सामील करून घेतला. असे सांगितले जाते की, पहिल्या सुरत लुटीतून आणलेली सर्व संपत्ती ही नेताजी पालकर यांनी लोहगड किल्ल्यावरच आणून ठेवली होती. Lohagad Fort Information In Marathi.

पेशवाई : इ.स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन कान्होजी आंग्रे यांना लोहगड किल्ला दिला. पुढे हा किल्ला पेशवांच्या ताब्यात होता; इ.स. १७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. इ.स. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा : “शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली.” नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. इ.स. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर इ.स. १८०२ मध्ये त्यांच्या पत्‍नी किल्ल्यावर येऊन राहिल्या.

इंग्रजांचा ताबा : तर नंतरच्या काळात इ.स. १८०३ मध्ये लोहगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला. तेथून अनिच्छेनेच मराठे मागे फिरले. Lohagad Fort Information In Marathi.

गडावर चढतांना सलग चार प्रवेशद्वारांमधून जावे लागते, ते पुढील प्रमाणे :

१. गणेश दरवाजा : हा गडाचा पहिला दरवाजा आहे.हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. लोहगडाच्या या गणेश दरवाजाच्या डाव्या व उजव्या आशा दोन्ही बुरुजांच्या खाली नरबळी देण्यात आला होता, आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. गणेश दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख आहेत.तर दरवाजावरील गणपतीच्या मूर्तीवरून दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव देण्यात आले आहे. Lohagad Fort Information In Marathi.

२. नारायण दरवाजा : नारायण दरवाजा हा १७८९ साली नाना फडणवीस यांनी बांधलेला दरवाजा आहे.नारायण दरवाज्यात एक भुयार आहे. त्या भुयाराच्या आत पूर्वी धान्य साठवले जायचे. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.

३. हनुमान दरवाजा : हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. मजबुत दगडांनी बांधलेला हा भक्कम दरवाजा आहे.

४. महादरवाजा : महादरवाजा हा लोहगडाचा मुख्य दरवाजा आहे. दरवाजावर हनुमानची मूर्ती कोरलेली आहे. या महादरवाजाचे बांधकाम देखील नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.

हे पण पहा : तिकोना किल्ला, https://marathimavla.com/tikona-fort-information-in-marathi/#more-471

लोहगड किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

१. लक्ष्मी कोठी : किल्ल्यावर लक्ष्मी कोटी म्हणून एक ठिकाण असून, लक्ष्मी कोठीत अनेक खोल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून लुटलेला सर्व खजिना हा लोहगडावरील याच लक्ष्मी कोठीत ठेवला होता. लक्ष्मी कोठी आजही आपल्याला गडावर पाहायला मिळते.

२. अष्टकोनी तलाव : गडावरील महादेवाच्या म्हणजे शिवमंदिराच्या समोरून सरळ रेषेत चालत गेल्यानंतर एक तलाव लागतो तो अष्टकोनी तलाव होय. या तलावाला आठ कोण आहेत.अष्टकोनी तलावाच्या समोर पिण्याच्या पाण्याचे गडावरील एकमेव टाके आहेत.

३. सोळाकोनी तलाव : लोहगडावर सोळा कोणाचा एक मोठा तलाव आहे; त्याला सोळाकोणी तलाव म्हटले जाते.अष्टकोणी तलावाच्या समोर चालत गेल्यानंतर १६ कोणी तलाव दिसतो. सोळाकोणी तलाव हा नाना फडणवीस यांनी गडावर बांधला.किल्ल्यावर पाणी पिण्याच्या व्यवस्थेसाठी एक तलाव बनवण्यात आला होता. या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात असे. म्हणूनच त्याला सोळा कोणी तलाव असे म्हटले जाते. Lohagad Fort Information In Marathi.

४. विंचू काटा : लोहगडावरील विंचू काटा हा लक्ष्मी कोठीच्या पश्चिम दिशेला आहे. विंचू काटा हा लोहगडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या विंचू काट्याची लांबी ही जवळपास १५०० मीटर लांब तर रुंदी ३० मीटर रुंद असून, विंचू काट्याच्या खाली दाट जंगल आहे. लोहगडावरील डोंगराची लांब सोंड ही दिसायला विंचवाच्या नांगी सारखी दिसते, म्हणून त्याला विंचू काटा असे म्हटले जाते. अरुंद व लांबलचक पसलेल्या टेहाळणी बुरुजासारख्या विंचू काट्यावरून पर्यटक सभोवतालचे निसर्ग सौंदर्य मनसोक्त अनुभवू शकतात. Lohagad Fort Information In Marathi.

५. महादेव मंदिर : किल्ल्यावर महादरवाजाच्या आत एक दर्गा असून दर्ग्यापासून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक शांत आणि प्रसन्न अतिशय सुंदर शिवमंदिर बघावयास मिळते.

६. शिवकालीन तोफा : किल्ल्यावर रक्षणार्थ तोफांची व्यवस्था करण्यात आली होती. या तोफा आज आपल्याला गणेश दरवाजामधून आत गेल्यावर मोकळ्या जागी या तोफा बघावयास मिळतात. मात्र आज या तोफा मोडकळीस आलेल्या आहेत.

७. गुहा : लोहगड हा किल्ला प्राचीन असल्याने या किल्ल्यावर एक गुहा देखील बघावयास मिळते. या गुहेमध्ये तब्बल ८० ते ९० लोक मावतील इतकी मोठी गुहा या गडावर आहे.

८. दर्गा : हनुमान दरवाज्यातून आत गेल्यावर दर्गा पाहायला मिळतो.

पोहोचण्याच्या वाटा :

पुण्याहून लोहगड किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :

१. बस : निगडी बस स्टॉप वरून तुम्हाला सिटी बस ने लोणावळा बस भेटेल.
निगडी बस स्टॉप – वडगाव – कामशेत – कार्ला फाटा (एकविरा) इथे उतरावे – इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो,कार ने लोहगडला जावे लागेल. (कार्ला फाटा (एकविरा) ते लोहगड किल्ला हे अंतर ७ कि.मी. इतके आहे.)

२. रेल्वे : थेट लोहगड किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही. परंतु,
पुणे रेल्वे स्टेशन वरून लोकल रेल्वे ने माळवली रेल्वे स्टेशन ला उतरावे. नंतर इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो, कार ने जावे लागेल. (माळवली रेल्वे स्टेशन ते लोहगड किल्ला हे अंतर ५ कि.मी. इतके आहे.)

३. खाजगी वाहन : मित्रांनो, लोहगड किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
पुणे – पिंपरी चिंचवड – देहू रोड सर्कल (चौक) – जुना पुणे मुंबई महामार्ग – वडगाव – नायगाव – कामशेत – कार्ला फाटा (एकविरा) – माळवली – भाजे रोड – भाजे घाट – लोहगड.

मुंबईहून लोहगड किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :

१ . बस : लोहगड किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही.(मुंबई – पुणे जुना रोडनेच जावे.)
मुंबई – खालापूर – खोपोली – जुना खंडाळा घाट – लोणावळा – माळवली – नंतर इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो, कार ने जावे लागेल. (माळवली रेल्वे स्टेशन ते लोहगड किल्ला हे अंतर ५ कि मी आहे. )

२. रेल्वे : थेट लोहगड किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही. इंद्रायणी एक्सप्रेस.
दादर रेल्वे स्टेशन – लोणावळा रेल्वे स्टेशनला उतरून तुम्हाला पुणे लोकल ट्रेन पकडावी लागणार पुढच्या मालवली रेल्वे स्टेशन साठी. माळवली रेल्वे स्टेशनला उतरावे. नंतर इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो,कार ने जावे लागेल. (माळवली रेल्वे स्टेशन ते लोहगड किल्ला हे अंतर ५ कि मी आहे.)

३. खाजगी वाहन : मित्रांनो, लोहगड किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
मुंबई – मुंबई सातारा महामार्ग – वाशी ब्रिज – वहाळ – खालापूर – खोपोली – जुना खंडाळा घाट – लोणावळा – कार्ला फाटा (एकविरा) – माळवली – भाजे घाट – लोहगड.

नाशिकहून लोहगड किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :

१. बस : लोहगड किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही.
नाशिक – सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरूनगर – चाकण – मोशी – भोसरी – पुणे. सिटी बस पकडून निगडी सिटी बस स्टॉप ला जावे. एथून तुम्हाला डायरेक्ट लोणावळा जाण्या सिटी बस भेटेल. नंतर कार्ला फाटा (एकविरा) इथे उतरावे. नंतर इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो.(रिक्शा) ने जावे लागेल. (कार्ला फाटा (एकविरा) ते लोहगड किल्ला हे अंतर ७ कि.मी. इतके आहे.) Lohagad Fort Information In Marathi.

२. रेल्वे : थेट लोहगड किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही.

३. खाजगी वाहन : मित्रांनो, लोहगड किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने जाऊ शकतो,
नाशिक – सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरूनगर – चाकण – महाळुंगे इंगळे – तळेगाव दाभाडे – वडगाव – कामशेत – कार्ला फाटा (एकविरा) – माळवली – भाजे घाट – लोहगड.

हे पण पहा : रायगड किल्ला, https://marathimavla.com/raigad-fort-information-in-marathi/

छायाचित्र :

FAQs :

१. लोहगड किल्ल्याजवळ कोणता किल्ला आहे ?
लोहगड किल्ल्याजवळ विसापूर किल्ला आहे.

२. लोहगड किल्ल्यावर किती पायऱ्या आहेत ?
लोहगड किल्ल्यावर सुमारे २५० ते ३०० पायऱ्या आहेत,

३. लोहगड किल्ला किती उंच आहे ?
लोहगड किल्ल्याची उंची ३४०० फूट आहे.

४. पुणे ते लोहगड किती किलोमीटर अंतर आहे ?
पुणे ते लोहगड अंतर ६३ किलोमीटर आहे.

५. लोहगड किल्ला किती कठीण आहे ?
लोहगड ट्रेक हा एक सोपा आणि मध्यम चढाईचा ट्रेक आहे.

हे पण पहा : तोरणा किल्ला, https://marathimavla.com/torna-fort-information-in-marathi/#more-416

hostinger is best website for bye domain for your website. https://www.hostinger.in