Panhala Fort Information In Marathi | पन्हाळागड किल्ल्याची माहिती मराठीत 2025.

Panhala Fort Information In Marathi.

पन्हाळा किल्ला

पन्हाळा किल्ला ज्याला पन्हाळगड किंवा पन्हाळा, असे वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.

पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक गिरीदुर्ग (डोंगरी) प्रकाराचा किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस २० किलोमीटर अंतरावर पन्हाळा येथे स्थित आहे. पन्हाळा किल्ल्याची उंची ४०४० फूट आहे. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते. डोंगरी किल्ल्यांचे महत्व, ‘भुईकोट किल्ल्यापेक्षा पाणकोट किल्ला चांगला व पाणकोट किल्लापेक्षा डोंगरी किल्ला चांगला महाराष्ट्रात गिरीदुर्गांची संख्या फार मोठी होती व आहे. पन्हाळा किल्ल्याला वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला आहे.

सह्याद्री पर्वतरांगेतील एका खिंडीकडे पाहताना हे सामरिकदृष्ट्या स्थित आहे , जो महाराष्ट्राच्या आतील भागात विजापूरपासून किनारपट्टीच्या भागात जाणारा एक प्रमुख व्यापारी मार्ग होता. त्याच्या सामरिक स्थानामुळे, दख्खनमध्ये मराठे , मुघल आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि ब्रिटीश यांच्यात झालेल्या अनेक युद्धांचे ते केंद्र होते, ज्यामध्ये सर्वात उल्लेखनीय म्हणजे पावन खिंडची लढाई. किल्ल्याचे अनेक भाग आणि त्यातील संरचना अजूनही सुआवस्तेथ आहेत. Panhala Fort Information In Marathi.

पन्हाळा किल्लाचे भौगोलिक स्थान :

पन्हाळगड हा कोल्हापूर शहराच्या वायव्येस २१ कि.मी. अंतरावर आहे. पन्हाळगड याची कोल्हापूर पासूनची उंची ७०० फूट असून, पन्हाळाच्या पायथ्यापासूनची उंची २७५ फूट आहे. या गडाचा घेर ४२ मैलाचा आहे. गडाच्या तटबंदीची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांभा खडक फोडून ३२ फूटापर्यंत तयार केली आहे. काही ठिकाणी तो १५ ते ३० फूट उंचीची दगडानी बांधलेली तटबंदी आहे.” तटाची रुंदी सर्वसाधारणपणे ५ फूट आहे, पण दरवाजे व माऱ्याच्या टापूत येणारा विभाग या ठिकाणी ती १५ फूट रुंदीची ठेवण्यात आली आहे. अशा ठिकाणी आत एक व बाहेर एक असे दुहेरी तट आहेत. Panhala Fort Information In Marathi.

डोंगरी किल्ला बांधताना सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते ती पिण्याच्या पाण्याची सोय ज्या ठिकाणी असेल तेथेच डोंगरी किल्ला हा उभारला जातो. पन्हाळगडाच्या भागात पाण्याच्या सोयी चांगल्या आहेत. कारण, या गडाच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेस कासारी व भोगावती या नद्यांनी हा भाग वेढलेला आहे. त्याचप्रमाणे पन्हाळगडावर ‘सादोबा तलाव’ व ‘सोमाला तलाव’ हे अदिलशहाच्या काळात बांधण्यात आले होते. तसेच पन्हाळयावर अनेक विहीरी आहेत यात उल्लेखनीय विहीरी ‘कर्पुर बाव’ (अश्वलायन तीर्थ), ‘अंधार बाव’ (श्रीनगर / शृंगारबाव), श्री संभाजी मंदीरातील विहीर इत्यादी आहेत. त्यामुळे पन्हाळगडावर पाण्याची कमतरता नसे व आजही भासत नाही.

Panhala Fort Information In Marathi.

पन्हाळगडाची विविध नावे :

ब्रम्हगिरी, पन्नगालय, प्रणालक, पद्मनाल, पनाला किंवा पुनाला, पन्हाळगड, शहानबी, पन्हाळा, परनालगड, पराशराश्रम, पराशरगड, पद्यालय, पर्णालपर्वत, पन्हाळदुर्ग, पनालपर्वत अशा कितीतरी नावांनी पन्हाळगड कालमानानुसार ओळखला जात असे. Panhala Fort Information In Marathi.

पन्हाळगड हा वेगवेगळया राजवटीच्या ताब्यात गेल्यावर या गडाची नावे बदलत गेल्याचे संदर्भ मिळतात. पन्हाळगडाचे पुराणकाळातील नाव ‘ब्रम्हगिरी’ असे होते. यापाठीमागची दंतकथा अशी सांगितली जाते की, ब्रम्हदेवाने प्रजा उत्पन्न ‘करण्याच्या हेतूने येथे ‘सोमेश्वर लिंग’ व ‘सोमेश्वर सरोवर’ निर्माण करून तपश्चर्या केली म्हणून या गडाचे नाव ‘ब्रम्हगिरी’ असे पडले. तसेच आणखी एक दंतकथा सांगितली जाते की, पन्हाळगडावर पराशर ऋषीनी उग्र तपश्चर्या केली. या तपश्चर्येत इंद्रराजाच्या सुचनेवरून नागांनी तपश्चर्येत विघ्ने आणली म्हणून पराशरांनी त्यांना शाप दिला. परंतु नाग शरण आल्याने त्यांनी शाप मागे घेतला, तेंव्हापासून हे ठिकाण नागांचे स्मरणार्थ ‘पन्नगालय’ (पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर) यावरून या गडास ‘पन्नगालय’ असे नाव पडले.

जुन्या शिलालेखातील वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव ‘प्रणालक’ किंवा ‘पद्मनाल’ असे आले आहे. यातून ‘पनाला’ शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव ‘शहानबी’- दुर्ग असे ठेवले होते. पुढे शिवाजी महाराजांच्याकडे या गडाचा ताबा आल्यावर तो ‘पन्हाळा’ या नावाने ओळखला जात होता. शिवकाळातील भूषन कवीने आपल्या काव्यात यास ‘परनालगड’ असे म्हणले आहे. ग्रैंडप च्या वर्णनात पन्हाळगडाचा उल्लेख ‘पनाला’ असा करण्यात आला आहे. तर मेजर ग्रॅहमने पन्हाळगडाचा उल्लेख ‘पनाला’ किंवा ‘पुनाला’ असा केला आहे. Panhala Fort Information In Marathi.

पन्हाळा किल्लाचा इतिहास :

पन्हाळगड कोणी बांधला याचा नामोल्लेख स्पष्टपणे मिळत नसला तरी येथील तटबंदी इ. स. पूर्व २०० ते ३०० या काळातील असावी असे वाटते. राष्ट्रकूट काळात राष्ट्रकूट राजा चंद्रराज याचा मुलगा दुसरा जतिज याच्या एका ताम्रपटात तो स्वतःला ‘पनालदुर्ग आद्रिसिंह’ म्हणवून घेत असे. यावरून राष्ट्रकूट काळातही या गडाचे नाव ‘पनाला’ असे होते हे सिद्ध होते. राष्ट्रकूट काळात ‘पन्हाळदुर्ग’ चांगलाच नावारूपाला आला होता. एक सुरक्षित आणि भक्कम किल्ला म्हणून या गडाची ख्याती सर्वत्र पसरली होती.

महाराष्ट्रात अनेक राजवटी होऊन गेल्या. शिलाहार ही एक नावारूपाला आलेली राजवट होती. या घराण्यातील महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज (दुसरा) हा दुर्ग बांधणारा अधिपती म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने इ.स. ११८७ मध्ये शिलाहार घराण्याची राजधानी वाळव्याहून कोल्हापूरला आणली. नंतर लगेच तीन वर्षांनी पन्हाळगडावर नेली. त्याने या परिसरात पंधराहून अधिक मजबूत किल्ले बांधले. राजाला पनालदुर्गाची तटबंदी बांधल्याचे श्रेय दिले जाते. Panhala Fort Information In Marathi.

पनाहाळा किल्ला ११७८ ते १२०९ दरम्यान बांधला गेला, जो शिलाहार शासक भोज दुसरा याने बांधलेल्या १५ किल्ल्यांपैकी (बावडा, भुदरगड , सातारा आणि विशालगडसह इतर) एक आहे . असे म्हटले जाते की कहां राजा भोज, कहां गंगू तेली हे या किल्ल्याशी संबंधित आहे. साताऱ्यात सापडलेल्या ताम्रपटावरून असे दिसून येते की राजा भोजाने ११९१-११९२ पर्यंत पन्हाळा येथे दरबार चालवला होता. १२०९-१२१० च्या सुमारास, देवगिरी यादवांपैकी सर्वात शक्तिशाली असलेल्या सिंघना (१२०९-१२४७) ने भोज राजाला पराभूत केले आणि नंतर हा किल्ला यादवांच्या ताब्यात गेला. व शिलाहार घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. स्पष्टपणे त्याची चांगली देखभाल झाली नाही आणि तो अनेक स्थानिक सरदारांच्या ताब्यात गेला.

इ.स. १३१८ साली देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता अल्लाउद्दीन खिलजीने संपुष्टात आणली. इ.स. १३७६ च्या शिलालेखांमध्ये किल्ल्याच्या आग्नेयेस नभापूरची वस्ती नोंदवली आहे. इ.स. १४५३ मध्ये बहामनी सुलतानाचा सरदार मलिक अत्तुजार याने शिर्क्यांचा पराभव करून पन्हाळगड जिंकून घेतला. त्याच वेळी खेळणा (विशाळगड) किल्ला जिंकण्यासाठी आक्रमण केले; परंतु शिर्क्यांनी मलिक अत्तुजारसह त्याच्या सात हजार सैनिकांची कत्तल केली आणि पन्हाळागड व खेळणा (विशाळगड) किल्ला आपल्या ताब्यात घेतला. इ.स. १४६९ मध्ये बहमनी सुलतानाचा पराक्रमी सरदार महम्मद गवान याने पन्हाळागड व विशाळगड हे दोन्ही किल्ले जिंकून ताब्यात घेतले. Panhala Fort Information In Marathi.

पन्हाळगड हि बिदरच्या बहामनींची एक चौकी होती. १४६९ च्या पावसाळ्यात एक प्रभावशाली पंतप्रधान महमूद गवान यांनी येथे तळ ठोकला होता. १४८९ मध्ये विजापूरच्या आदिल शाही राजघराण्याच्या स्थापनेनंतर , पन्हाळा विजापूरच्या ताब्यात आला आणि त्याला मोठ्या प्रमाणात तटबंदी देण्यात आली. त्यांनी किल्ल्याचे मजबूत तटबंदी आणि प्रवेशद्वार बांधले जे परंपरेनुसार बांधण्यासाठी शंभर वर्षे लागली. किल्ल्यातील असंख्य शिलालेख इब्राहिम आदिल शाह, कदाचित इब्राहिम पहिला (१५३४-१५५७) यांच्या कारकिर्दीचा संदर्भ देतात. इ.स. १५३८ मध्ये बहमनी राजवटीची निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, कुतबशाही, बरीदशाही अशी शकले पडली. पन्हाळगड विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात गेला. आदिलशाहीच्या काळातच पन्हाळागडावर तीन दरवाजा, कलावंतिणीचा सज्जा, चार दरवाजा, अंधारबाव, धर्मकोठी इत्यादी इमारतींचे बांधकाम करण्यात आले.

शिवकालीन कागदपत्रातही ‘पनालगड’ असा उल्लेख आहे. आदिलशाही राजवटीत या गडाचे नाव ‘शहानबी दुर्ग’ असे ठेवले होते; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९ साली हा गड जिंकून स्वराज्यात घेतल्यावर पुन्हा जुने नाव ‘पनालगड’ कायम केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबने पन्हाळगड जिंकून त्याला ‘नबीशहागड’ असे नाव ठेवले होते; परंतु हे नाव फार काळ टिकले नाही. Panhala Fort Information In Marathi.

२ मार्च १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. ६ मार्च १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली. इ.स. १८२७ साली इंग्रज अधिकारी कर्नल वेल्श याने पन्हाळगडाला ‘Watery Mountain’ तर पावनगडाला ‘Windy Mountain’ असे संबोधले. इ.स. १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि पन्हाळगड :

छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील रयतेची विजापूरच्या आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघलशाही, पोर्तुगीज यांच्या जुलमी सत्तेतून मुक्त करण्याचा विडा उचलला होता. मजबूत स्वराज्यनिर्मितीसाठी किल्ल्यामागून किल्ले जिंकून घेण्यास सुरुवात केली होती. १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफझलखानाचा वध करून ते पन्हाळगडावर आले. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी रात्रीच्या वेळी शिवराय पन्हाळगडावर पोहोचले. Panhala Fort Information In Marathi.

अफझलखानाच्या वधामुळे आदिलशाही खचली होती. शिवरायांबद्दल घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तरी सुद्धा शिवराय पन्हाळगडावर आल्याचे कळताच आदिलशहाने आणि बडी बेगमसाबाने शिवरायांवर सिद्दी जौहर, फाजलखान (अफझलखानाचा मुलगा) सिद्दी मसूद इत्यादी नामवंत आणि क्रूर सरदारांना पाठवले. त्यांनी पन्हाळागडला वेढा दिला. मजबूत वेढ्यामुळे शिवरायांनी पन्हाळगडावर शांत राहणेच पसंत केले. परंतु सहा महिने झाले पावसाळा आला तरी वेढा हलण्यास तयार नाही. मग मात्र शिवरायांनी वेढ्यातून निसटण्याच्या हालचाली सुरू केल्या.

सैन्यबळ कमी असूनही छत्रपती शिवराय युद्धशास्त्र, दूरदृष्टीपणा, कल्पकता, शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणे यात अजोड होते. सिद्दी जौहरला ‘आम्ही शरण येत आहोत’ असा निरोप धाडून ते स्वतः १२ जुलै १६६० रोजी रात्रीच्या वेळी धो-धो पावसातून राजदिंडी नामक चोरदरवाजातून निवडक सहाशे मावळ्यानिशी पन्हाळगडावरून बाहेर पडले आणि विशाळगडाकडे दौडू लागले. इकडे शिवरायांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या शिवा काशीदला पालखीत बसवत खानाच्या भेटीस पाठवले. शत्रुसैन्याने ‘शिवाजी महाराज’ नाही ते हे ओळखले. सिद्दी जौहरने वीर शिवा काशीदला ठार मारले. त्याने स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्याचे बलिदान व्यर्थ गेले नाही. Panhala Fort Information In Marathi.

इकडे विशाळगडाच्या दिशेने कूच करणाऱ्या शिवरायांचा सिद्दी मसूद घोडदळासह पाठलाग करू लागला.महाराजांच्या साथीला बांदलांचे सहाशे मावळे होते.त्याचे नेतृत्व रायाजी बांदल करत होते.रात्रभर घोडदौड करून शिवराय आणि मावळे पांढरपाणी येथे पोहोचले. गनीम जवळ येत होता. शिवरायांनी आपल्याजवळील सैनिकांचे दोन भाग केले. रायाजी बांदल, संभाजी जाधव (सरसेनापती धनाजी जाधव यांचे आजोबा), हैबतराव बांदल, विठोजी काटे,बाजीप्रभू यासारख्या पराक्रमी साथीदारांना पांढरपाणी येथे ठेवले.अर्थात रायाजीनेच पांढरपाणी येथे आपण स्वतःच थांबण्याचा हट्ट धरला होता.शिवराय ३०० मावळ्यांसह विशाळगडाकडे धावू लागले. घोडखिंडीतून शिवराय पुढे सरकत होते. पुढे जाण्याचा एकच मार्ग होता. रायाजी बांदल आणि त्यांच्या साथीदारांची येथेच सिद्दी मसूदच्या सैन्याशी जोरदार लढाई झाली. तीन ते चार तासांच्या धुमश्चक्रीत रायाजी बांदल,विसोजी काटे संभाजी जाधव,बाजीप्रभू फुलाजी प्रभू यांना वीरमरण आले. एवढ्या कालावधीत शिवराय विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते.

इकडे विशाळगडाला जसवंत दळवी, सूर्यराव सुर्वे यांनी वेढा घातला होता. शिवरायांनी हा वेढा फोडला आणि गडावर सुखरूप पोहोचले. तोफांचा आवाज झाला. घोडखिंडीत अनेक मावळे धारातीर्थी पडले होते. उरलेसुरले ते जंगलात गायब झाले. सिद्दी मसूदच्या सैन्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्याचे सैन्य विशाळगडाच्या पायथ्याला भिडले; परंतु शिवरायांच्या ताज्या दमाच्या सैन्याने त्यांचा पराभव केला. शिवरायांनी घोडखिंडीला ‘पावनखिंड’ असे नाव दिले. शिवरायांची पन्हाळगडावरून सुटका आणि रायाजी बांदल व त्यांच्या साथीदारांचा पराक्रम इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखाच आहे.सर्व काही शांत झाल्यावर शिवराय स्वतः बांदलांच्या घरी गेले आणि बांदल कुटुंबियांचे सांत्वन केले. Panhala Fort Information In Marathi.

पन्हाळगडावरून सुटका करून घेतल्यावर शिवरायांनी आदिलशहाशी तह करून तो किल्ला आदिलशहाच्या ताब्यात दिला. इ. स. १६६६ मध्ये मिर्झाराजे जयसिंगाच्या रूपाने महाराष्ट्रावर मोठे संकट आले होते. त्यांच्याशी झालेल्या तहाप्रमाणे शिवराय पन्हाळगडावर चाल करून गेले; पण त्यात शिवरायांचा पराभव झाला. स्वराज्याला १५०० मावळे गमवावे लागले. Panhala Fort Information In Marathi.

पन्हाळा गडावरील दरवाजे :

१. चार दरवाजे : सध्या पन्हाळगडावर ज्या रस्त्याने वाहने जातात, त्या रस्त्याने गडावर प्रवेश केल्या केल्याच चार दरवाजाचे अवशेष दिसून येतात. पूर्व दिशेला तोंड करून दोन बलदंड बुरुजांमध्ये पहिला दरवाजा होता. त्यानंतर लगेचच दुसरा दरवाजा. चक्राकार तटाभोवती फिरल्यानंतर तिसरा दरवाजा लागतो. तेथून पुढे गेल्यावर चौथा दरवाजा लागतो. इ.स १८४४ साली इंग्रजांनी हे चार दरवाजे उद्ध्वस्त केल्यामुळे थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. या चार दरवाजांचे केवळ अंदाज बांधू शकतो. शत्रूला गडावर सहजासहजी प्रवेश करता येऊ नये ,या उद्देशाने एकामागे एक असे चार दरवाजे बांधलेले होते.संरक्षक आणि मोक्याच्या ठिकाणी असून वाघ दरवाजाच्या प्रमुख संरक्षक इतिजापैकी एक आहे. या बुरुजाच्या समोरील एक बुरूज आताच्या व्हॅली व्ह्यू हटेिलच्या ताब्यात आहे. या बुरुजाला सध्या ‘बाजीप्रभू बुरूज’ म्हणून ओळखले जाते.

२. तीन दरवाजे : पन्हाळगडाच्या पश्चिमेस आजही सुरक्षित स्थितीत ‘तीन दरवाजा’ के ठिकाण आहे. या दरवाजाला ‘कोकणी दरवाजा’ असेही संबोधले जाते. या ठिकाणी एकापाठोपाठ एक असे तीन दरवाजे आहेत. सध्या येथे केवळ दगडी मळसूत्रे शिल्लक असली तरी ती सुस्थितीत आहेत. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला. पन्हाळगड जिंकल्यावर याच तीन दरवाजाच्या मधल्या चौकात छत्रपती शिवरायांचे ‘सुवर्णपुष्प’ उधळून स्वागत पदस्पर्शाने पावन झाला आदिलशहाच्या कालावधीत या तीन दरवाजांचा जीर्णोद्धार झाला होता. Panhala Fort Information In Marathi.

३. वाघ दरवाजा : गडाच्या उत्तर बाजूस असणारा हा दरवाजा अत्यंत मजबूत बांधणीचा होता. येथे सापडलेला शत्रू सहसा सुटू शकत नाही. म्हणूनच या दरवाजाला ‘वाघ दरवाजा’ असे नाव पडले आहे.

४. चोर दरवाजे :‘आपत्कालीन दरवाजे’ या नावानेही हे दरवाजे ओळखले जातात. शत्रूच्या तावडीतून निसटण्यासाठी किंवा शत्रूला कचाट्यात पकडण्यासाठी या दरवाजांचा उपयोग केला जात असे. त्यापैकीच एक आजही पन्हाळगडावर अस्तित्वात आहे. तो दरवाजा ‘अंधार बाव’ या नावाने ओळखला जातो.

५. राजदिंडी : पन्हाळगडावर असलेला आणखी एक आपत्कालीन दरवाजा म्हणजे ‘राजदिंडी’ होय. ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले. Panhala Fort Information In Marathi.

पन्हाळा गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

१. राजवाडा : छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राणी येसूबाई व त्यांचा पुत्र शाहू यांना औरंगजेबने अटक केले होते. त्यामुळे स्वातंत्र्यसंग्रामाची सूत्रे महाराणी ताराबाई पन्हाळगडावरून हलवत असत. त्यांनीच पन्हाळगडाला राजधानीचा दर्जा दिला व येथे राज्यकारभार पाहण्यासाठी राजवाडा बांधून घेतला. हा राजवाडा अत्यंत सुंदर व साध्या पद्धतीचा आहे. या राजवाड्यात देवघर व तुळशीवृंदावन आहे. देवघरातील चौकोनी दगडावर छत्रपती घराण्यातील पूर्वजांच्या पादुका कोरल्या आहेत. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.

२. सज्जाकोठी : सज्जाकोठीलाच सदर-ई-महाल असेही म्हटले आहे. ही इमारत आदिलशाहीच्या कारकीर्दीत बांधली आहे. इमारतीची लांबी ३६ फूट व उंची ७२ फूट रुंदी ३६ आहे. शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेरखान पठाणाकडून सोडवून आणल्यानंतर याच वास्तूत पिता-पुत्रांची भेट झाली. संभाजीराजांना पन्हाळा सुभ्याचा कारभार सोपवन शिवाजी महाराज स्वराज्याचा कारभार बघण्यासाठी रायगड किल्ल्या वर गेले. संभाजी राजांची आणि शिवाजी महाराजांची गुप्त खलबते येथेच चालत.

३. राजदिंडी : ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले. Panhala Fort Information In Marathi.

४. अंबरखाना : अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ होती.

५. सोमाळे तलाव : गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्र मावळ्यांनी लक्ष चाफ्याची फुले वाहिली होती.

६. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी : सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची. Panhala Fort Information In Marathi.

७. रेडे महाल : रेडेमहाल म्हणजे वास्तुशास्त्राचा एक सुरेख नमुना होय. या इमारतीत जनावरे, रेडे बांधत असत. म्हणून या वास्तूला ‘रेडेमहाल’ असे म्हटले जात असे. वस्तुतः ही पागा आहे.

८. संभाजी मंदिर- ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे. Panhala Fort Information In Marathi.

९. धर्मकोठी : संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते, सध्या पोलीस स्टेशन असणारी इमारत म्हणजे ‘धर्मकोठी’ होय. पूर्वी या ठिकाणी न्यायदान करण्याचे काम केले जात असे. तशेच येथे यथायोग्य दानधर्म करत.

१०. अंदरबाव : तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला हा चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो. Panhala Fort Information In Marathi.

११. महालक्ष्मी मंदिर : राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

१२. बाजीप्रभूंचा पुतळा : एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

१३. कर्पूर बाव : कर्पूर बावीलाच ‘अश्वलायन तीर्थ’ असे म्हटले जाते. गडावरील एस.टी.स्टँड शेजारीच आजही ही बाव आहे. तिचे पाणी पिण्यासाठी आजही वापरले जाते. Panhala Fort Information In Marathi.

१४. अंधार बाव : अंधार बावीलाच ‘शृंगारबाव’ असेही म्हटले जाते. ही एक विहीर नसून दोन मजली इमारतच आहे. याच इमारतीतून गडाबाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आजही अंधारबावीत पाणी आढळते.

१५. जलतीर्थ : तीन दरवाजातून आत आल्यानंतर पाण्याचे एक कुंड लागते. येथे बारमाही पाणी असते. Panhala Fort Information In Marathi.

१६. नागझरी : स्वच्छ व बारमाही पाणी असलेले हे ठिकाण ‘नागझरी’ या नावाने प्रसिद्ध आहे. येथील पाणी लोहयुक्त आणि थंड आहे. प्राचीन नागवंशीय लोकांच्या वस्तीवरून या झऱ्याला ‘नागझरी’ असे नाव पडले आहे.

१७. पन्हाळगडावरील इमारती : पन्हाळगडावर आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊ. Panhala Fort Information In Marathi.

१८. अंबरखाना : पन्हाळगडावरील सर्वांत मोठी, सुसज्ज आणि भक्कम इमारत म्हणजे ‘अंबरखाना’ होय. अंबरखान्यालाच ‘बालेकिल्ला’ असे म्हटले जाते. धान्य, गवत, कपडालत्ता, शस्त्रे, दारूगोळा यांची साठवण करून ठेवण्यासाठी या इमारतींचा उपयोग केला जात असे. इ.स. १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंदने गड जिंकल्यावर छत्रपती शिवरायांनी अंबरखान्याची पाहणी केली होती.
या अंबरखान्यात तीन मोठ्या कोठ्या होत्या. गंगा, यमुना, सिंधू अशी त्यांची नावे होती. या तिन्ही कोठ्यांत सुमारे २५०० खंडी धान्य मावत असे. गंगा कोठी १०२०० चौरस फूट होती. सिंधू कोठी १५२′ x ४०′ x १८′ आकाराची होती, तर यमुना कोठी ८८′ x ३५′ x ३०′ आकाराची होती. आजही ही इमारत सुस्थितीत पाहायला मिळते.

१९. कलावंतीण सज्जा : सज्जाकोठीसारखीच ही इमारत आहे. या इमारतीला नायकिणीचा सज्जा असेही म्हणतात. आज इमारतीची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे परंतु एके काळी ही इमारत अत्यंत प्रेक्षणीय अशी होती. १८४४ साली इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यात ही इमारत नष्ट झाली.

हे पण पहा :  विसापूर किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/visapur-fort-information-in-marathi/#more-973

पन्हाळा गडावरील इतर काही महत्त्वाची स्थळे :

१. रणवीर बाजीप्रभू यांचा पुतळा : पन्हाळगडावर प्रवेश करताच डाव्या बाजूला काही अंतर गेल्यावर रणवीर बाजीप्रभूचा पुतळा लागतो. हातात दोन नंग्या तलवारी घेऊन लढाईच्या आवेशात उभा असलेला हा पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पुतळा पाहताच बाजीप्रभूने पावनखिंडीत गाजवलेला पराक्रम आठवतो. पन्हाळगडावरून निसटल्यानंतर शिवराय बाजीप्रभू, संभाजी जाधव, रायाजी बांदल, विठोजी काटे फुलाजी प्रभू यासारख्या पराक्रमी सहकाऱ्यांसोबत विशाळगडावर जात असताना वाटेत पांढरे पाणी’ या ठिकाणी सिद्दी मसूदच्या सैन्याने गाठले. शिवरायांकडे सैन्याचे विभाजन करून एक तुकडी रायाजी बांदल यांच्या स्वाधीन करून पुढे जाण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. बांदलांनी शर्थीने खिंड लढवली. दोन-तीन तास शत्रूला रोखून धरले. त्यात त्यांना सर्वांना वीरमरण आले.

२. तबक उद्यान : पन्हाळगडावरील उत्तरेकडील वाघ दरवाजा उतरून खाली गेल्यावर ‘तबक उद्यान’ लागते. हे पन्हाळगडावरील अतिशय थंड आणि निसर्गरम्य असे ठिकाण आहे. येथे सर्पोद्यान होते. आज ते नामशेष होत आहे. उद्यानात पन्हाळगडाची प्रतिकृती बनवलेली आहे. त्यामुळे पन्हाळगडावरील विविध ठिकाणांची दिशा समजण्यास मदत होते. येथील उद्यानात झाडांना त्यांच्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत. गडावर सहलीसाठी आलेले लोक, पर्यटक, विद्यार्थी आपल्याबरोबर बांधून आणलेल्या भोजनावर येथेच ताव मारतात.

३. पन्हाळा वस्तुसंग्रहालय : शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी, दगडी मूर्ती, काही महत्त्वाचे दस्त येथे पाहायला मिळतात. अनेक दुर्मीळ ऐतिहासिक वस्तू येथे पाहायला मिळतात. Panhala Fort Information In Marathi.

४. संभाजी देवालय : महाराणी ताराबाई यांनी आपली सवत राजसबाई यांचा पुत्र संभाजी यास गादीवर बसवून पन्हाळगडावरून राज्यकारभार चालू ठेवला होता. इ.स. १७१४ ते १७६० ही त्यांची कारकीर्द होय. संभाजीराजे खूप लोकप्रिय होते. लोकांना त्यांचे रोज दर्शन घडावे म्हणूनच त्यांचे पन्हाळगडावर मंदिर बांधले.

हे पण पहा :  पुरंदर किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/purandar-fort-information-in-marathi/#more-900

पन्हाळा किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरूज :

१. तटबंदीतील कोठार : तटबंदीमध्ये शस्त्रास्त्रे, धान्य, दारूगोळा लपवण्यासाठी खास व्यवस्था केलेली आढळते. कैदी ठेवण्यासाठीही खोल्या बांधलेल्या होत्या. अंधारबावीतून तटबंदीला असलेले भुयार आजही पाहायला मिळते.

२. शिवा काशिद स्मारक : पन्हाळगडावर प्रवेश करताच शिवा काशिदचा पुतळा दृष्टीस पडतो. शिवरायांच्या चमत्कारिक इतिहासातील शिवा काशिद ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. सिद्दी जौहरच्या वेढ्याच्या वेळी सुटका करून घेण्यासाठी शिवरायांनी सिद्दीला ‘आम्ही तुम्हास भेटावयास येत आहोत’ असा निरोप धाडून सिद्दीच्या वेढ्याला गाफील ठेवले होते. त्यामुळे वेढा ढिला होण्यास मदत झाली. १२ जुलै १६६० रोजी पौर्णिमेच्या रात्री गडावरून दोन पालख्या निघाल्या. एक शिवरायांची आणि दुसरी शिवा काशिदची… शिवरायांची पालखी विशाळगडाच्या दिशेने जात होती; तर शिवा काशिदला ओळखायला सिद्दीला दोन तासांचा अवधी लागला होता. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी विशाळगडाच्या दिशेने कूच केले होते. इकडे सिद्दीच्या छावणीतच शिवा काशीदची ओळख पटताच त्याच्या पोटात तलवार खुपसून त्याला मारले गेले.स्वराज्यासाठी शिवा काशीदचे बलिदान अनमोल ठरले.

३. पन्हाळगडाची तटबंदी : पन्हाळगडाची तटबंदी शिलाहार, राष्ट्रकूट घराण्याच्या काळात बांधली असावी, असे काही इतिहासकारांचे मत आहे. ही तटबंदी अतिशय मजबूत असून चिरेबंदी आहे. तटबंदी सुरक्षित राहण्यासाठी तटावर गवत, झाडे उगवू दिली जात नसत. वेळोवेळी तटाची डागडुजी केली जात असे. काली बुरुजाच्या बाजूस पन्हाळगडाची बाजू कमकुवत आहे हे लक्षात घेऊन या बाजूसच पन्हाळगडाचा जोडकिल्ला पावनगड आहे. पावनगडावरूनही तोफांचा मारा होऊ शकतो. म्हणूनच ही बाजू दुहेरी तटबंदी बांधून मजबूत केलेली दिसून येते. यालाच पडकोट किंवा परकोट असे म्हणतात. तोफांच्या माऱ्याने एक तटबंदी ढासळली तरी दुसऱ्या तटबंदीने संरक्षण करता येत होते. या तटबंदीतून परकोटात जाण्यासाठी दक्षिणेच्या दिशेस एक दरवाजा आहे. या दरवाजाच्या कमानीला नागशिल्पे कोरली आहेत. म्हणून या दरवाजाला ‘नागफणी दरवाजा म्हटले जात असे.

४. सज्जाकोठीजवळचा पडकोट : कालीबुरुजाच्या बाजूस जसा पडकोट आहे ,तसाच पडकोट सज्जाकोठीच्या उजव्या बाजूस आहे. या पडकोटामुळे पूर्वेकडील परिसराची टेहळणी करणे सोपे जात असे. शत्रूच्या हालचालीवर लांबूनच लक्ष ठेवणे शक्य होत असे. पन्हाळगडाच्या पूर्व बाजूची तटबंदी सोडली तर सर्व दिशांना आजही चोरदरवाजे अस्तित्वात आहेत. शत्रूच्या हल्ल्यात तो उद्ध्वस्त झाला असावा असे वाटते.

५. गडावरचे बुरूज : पन्हाळगडावर जवळजवळ ४८ बुरूज आहेत. सर्व बुरूज अगदी मोक्याच्या ठिकाणी बांधलेले आहेत. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि लढाईच्या म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगी तोफांचा मारा करण्यासाठी या बुरुजांचा वापर होत असे. आज अनेक बुरूज ढासळलेल्या अवस्थेत आहेत. इ. स. १७०१ मध्ये औरंगजेबने पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्या वेळी मोगलांच्या बाजूने लढणारा छत्रसाल राठोडचा मुलगा हत्तीसिंग पन्हाळ्याच्या मोहरा बुरुजासमोर ठार झाला होता. बुरुजाला बोलीभाषेत ‘हुडा’ असे म्हणत असत.

६. काळा टॉवर : पन्हाळगडाच्या पूर्व बाजूस असणाऱ्या या बुरुजावरून पन्हाळा व पानवगडाच्या मधून जाणाऱ्या वाटेवर नजर ठेवता येत असे. या बुरुजावर तोफ होती. तोफेची दिशा फिरवण्याची तेथे खंदक पाडून सोय केली होती. त्यामुळे येथील तोफ काटकोनात वळवता येत असे. बुरुजावर असलेल्या कालीमातेच्या मंदिरावरून या बुरुजाला ‘काली बुरूज’ असे नाव पडले गेले.

७. उत्तर बुरूज : सज्जाकोठीच्या उत्तर दिशेला हा एक बळकट बुरूज आहे. या बुरुजावरून पन्हाळगडाच्या उत्तरेकडील भूप्रदेशावर नजर ठेवता येते. हा बुरूज अत्यंत संरक्षक आणि मोक्याच्या ठिकाणी असून वाघ दरवाजाच्या प्रमुख संरक्षक इतिजापैकी एक आहे. या बुरुजाच्या समोरील एक बुरूज आताच्या व्हॅली व्ह्यू हटेिलच्या ताब्यात आहे.

८. दुतोंडी बुरुज: सध्या पन्हाळगडावर काही ठरावीकच बुरूज अस्तित्वात आहेत. जे बलदंड आणि मजबूत आहेत ते टिकले आहेत. त्यापैकी एक बुरूज म्हणजे “दुतोंडी बुरूज’ होय. या बुरुजावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन बाजूने पायऱ्या आहेत. म्हणून या बुरुजास ‘दुतोंडी बुरूज’ या नावाने ओळखले जाते. या बुरुजाच्या शेजारी ‘दौलती बुरूज’ आहे.

९. पुसाटी बुरूज : पन्हाळगडाची माची ज्या ठिकाणी संपते त्या टोकाला एका मागे एक असे दोन बलदंड बुरूज बांधले आहेत. या बुरुजाच्या समोरच मसाईचे पठार आहे. एका बुरुजाकडून दुसऱ्या बुरुजाकडे जाण्यासाठी खंदक खणून वाट केलेली आहे. दोन बुरुजांकडे ये-जा करण्यासाठी असलेला दरवाजा आज पूर्णतः नामशेष झाला आहे.

अशा प्रकारे पन्हाळगडावर एकूण अट्ठेचाळीस बुरूज आहेत. त्यातील अनेक बुरूज काळाच्या ओघात नामशेष झालेले आहेत. Panhala Fort Information In Marathi.

हे पण पहा :  मुरूड-जंजिरा किल्ल्याची माहिती मराठीत.  https://marathimavla.com/murud-janjira-fort-information-in-marathi/#more-824

पन्हाळा किल्ल्याची छायाचित्र :

पोहोचण्याच्या वाटा :-

पुण्याहून पन्हाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी कसे जावे :-

१. बस : पन्हाळा किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही. परंतु पुणे ते कोल्हापूर आणि नंतर कोल्हापूर ते पन्हाळा या बस ने पन्हाळा किल्ल्या जवळ जाऊ शकता.
स्वारगेट – शिरवळ – पारगाव खंडाळा – खंबाटकी घाट – भुईज – सातारा – कोल्हापूर. नंतर कोल्हापूर तो पन्हाळा बस भेटेल,

२. रेल्वे : थेट पन्हाळा किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही.
पुणे ते कोल्हापुर तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. परंतु नंतर तुम्हाला, कोल्हापूर तो पन्हाळा या बस ने जावा लागेल.

३. खाजगी वाहन : मित्रांनो, पन्हाळा किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
स्वारगेट – आण्णाभाऊ साठे चौक – नरवीर तानाजी मालुसरे रोड -वीर बाजी पासलकर चौक – शिंदेवाडी – वर्वे – कापूरहोळ – सारोळा – शिरवळ – धनगरवाडी – पारगाव खंडाळा – खंबाटकी घाट – सुरूर – भुईज – पांचवड – सातारा – शेंद्रे – बोरगाव – अपशिंगे – खोजेवाडी – तारगाव – मसूर – कराड -पेठ चौक – पेठ -शिराळा – काखे – पन्हाळा – पन्हाळा किल्ला.

मुंबईहून पन्हाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी कसे जावे :-

१ . बस : पन्हाळा किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही.परंतु मुंबई ते कोल्हापूर आणि नंतर कोल्हापूर ते पन्हाळा या बस ने पन्हाळा किल्ल्या जवळ जाऊ शकता.
मुंबई ते कोल्हापूर तुम्ही दोन मार्गे जाऊ शकतो, पुणे मार्गे आणि चिपळूण मार्गे. नंतर कोल्हापूर तो पन्हाळा बस भेटेल,

२. रेल्वे : थेट पन्हाळा किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही.
मुंबई ते कोल्हापुर तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. परंतु नंतर तुम्हाला, कोल्हापूर तो पन्हाळा या बस ने जावा लागेल.

३. खाजगी वाहन : मित्रांनो, पन्हाळा किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
.मुंबई – नवी मुंबई – खोपोली – जुना खंडाळा घाट – खंडाळा – लोणावळा – कार्ले/एकविरा फाटा – पठारगाव – कामशेत – देहू ओढ सरकल एस.पी – रावेत .- मुंबई पुणे बायपास – बावधन – वारजे – वारजे ब्रिज – नवले ब्रिज – शिंदेवाडी – वर्वे – कापूरहोळ – सारोळा – शिरवळ – धनगरवाडी – पारगाव खंडाळा – खंबाटकी घाट – सुरूर – भुईज – पांचवड – सातारा – शेंद्रे – बोरगाव – अपशिंगे – खोजेवाडी – तारगाव – मसूर – कराड -पेठ चौक – पेठ -शिराळा – काखे – पन्हाळा – पन्हाळा किल्ला.

नाशिकहून राजगड किल्ल्याकडे जाण्यासाठी कसे जावे :-

१. बस : पन्हाळा किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही.परंतु नाशिक ते कोल्हापूर आणि नंतर कोल्हापूर ते पन्हाळा या बस ने पन्हाळा किल्ल्या जवळ जाऊ शकता.
नाशिक – सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरूनगर – चाकण – मोशी – भोसरी – स्वारगेट – शिरवळ – पारगाव खंडाळा – खंबाटकी घाट – भुईज – सातारा – कोल्हापूर. नंतर कोल्हापूर तो पन्हाळा बस भेटेल.

२. रेल्वे : थेट पन्हाळा किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही.
नाशिक ते मुंबई आणि नंतर मुंबई ते कोल्हापुर तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. परंतु नंतर तुम्हाला, कोल्हापूर तो पन्हाळा या बस ने जावा लागेल.

३. खाजगी वाहन : मित्रांनो, पन्हाळा किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने जाऊ शकतो,
नाशिक – सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – शिरूर – सुपे – मोरगाव – नीरा – लोणंद – कोरेगाव – रहिमतपूर – मसूर – कराड -पेठ चौक – पेठ -शिराळा – काखे – पन्हाळा -पन्हाळा किल्ला.

हे पण पहा : सिंहगड किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/sinhagad-fort-information-in-marathi/#more-596 

FAQs :

१. पन्हाळ्याचे जुने नाव काय आहे?
–करवीर किंवा कोल्हापूर पुराण, आधुनिक (१७३०) संकलनात पन्हाळा शहराचा उल्लेख पन्नागलाई (सर्पांचे घर) असा केला आहे. जुन्या शिलालेखांमध्ये, हे नाव प्राणलक आणि पद्मनाळ असे आढळते.

२. पन्हाळा किल्ल्याचे वैशिष्ट्य काय आहे?
–१६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कैद्यांपासून धाडसी सुटका केली तेव्हा पन्हाळा किल्ला प्रसिद्ध होता.

३. शिवाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेण्यास कोणी भाग पाडले?
–१६६० मध्ये, शिवाजी महाराजांच्या जलद प्रगतीला आळा घालण्यासाठी, आदिलशहाने कर्नुल प्रदेशाचा सरदार सिद्दी जौहर याला मोठ्या सैन्यासह शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवले. आदिलशहाने सिद्दीला ‘सलाबतखान’ ही पदवी दिली. अशा परिस्थितीत, शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यात आश्रय घेतला.

४. पन्हाळा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
–१. पन्हाळा फिरण्यासाठी सर्वोत्तम वेळ जून ते मार्च महिना आहे. २. पन्हाळा शहरातील रस्त्यांवर रांगेत दिसणाऱ्या विविध रस्त्याच्या कडेला असलेल्या आइस्क्रीम स्टॉल्सचा शोध घेत एक चांगली संध्याकाळ घालवा.

५. पन्हाळ्याची लढाई कोणी जिंकली?
–प्रतापगडच्या लढाईत गमावलेले प्रदेश परत मिळवण्याच्या उद्देशाने अली आदिल शाह दुसरा याच्या नेतृत्वाखाली हा उल्लेखनीय वेढा घालण्यात आला. या वेढ्याला मोठे यश मिळाले, ज्यामुळे आदिल शाही राजवंशाचे महत्त्वाचे प्रदेश परत मिळवण्यात आले. तथापि, १६७३ मध्ये शिवाजीने पन्हाळा किल्ला परत मिळवला

हे पण पहा :  हरिश्चंद्रगड किल्ल्याची माहिती मराठीत.  https://marathimavla.com/harishchandragad-fort-information-in-marathi/#more-702

हे पण पहा :  हरिहर किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/harihar-fort-information-in-marathi/#more-863

Hostinger Is Best Website For Buy Domain For Your Website. https://www.hostinger.in