Visapur Fort Information In Marathi.
विसापूर किल्ला
विसापूर जेल याच्याशी गल्लत करू नका.
“विसापूर किल्ला” ऊर्फ “संबळगड” हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गिरीदुर्ग प्रकारचा किल्ला आहे.
मुंबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की, लोहगड-विसापूर ही किल्ल्यांची जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा हा विसापूर किल्ला, लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता. विसापूर किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची हि ३,५५६ फूट आहे. विसापूर हा किल्ला पुणे जिल्ह्यात माळवली रेल्वे स्थानकापासून ५ ते ६ किमी अंतरावर आहे. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. Visapur Fort Information In Marathi.
विसापूर किल्ल्याचा इतिहास :
विसापूर किल्ल्याचा इतिहासामध्ये फारसा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे गड कोणी बांधला याची ठोस माहिती उपलब्ध होत नाही. तेथे एक विहीर आहे जी पांडवांनी बांधली असे स्थानिक आख्यायिका सांगतात. मात्र, लोहगडाच्या इतिहासात डोकावल्यास गडाच्या इतिहासाबद्दल अंदाज लावला जाऊ शकतो. म्हणजेच लोहगड बराच काळ आदिलशहाच्या आधिपत्याखाली होती. लोहगड आणि विसापूर हे दोन्ही गड शेजारी-शेजारी आहेत. त्यामुळे लोहगडाच्या सोबतीने विसापूरवर सुद्धा आदिलशहाचे वर्चस्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Visapur Fort Information In Marathi.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा विडा हाती घेतला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक गडांवर स्वराज्याचा भगवा फडकवण्यात आला. याच दरम्यान शिवरायांनी मावळ्यांच्या सोबतीने कल्याण आणि भिवंडी हा सर्व परिसर इ.स. १६५७ साली स्वराज्यात सामील करून घेतला. याच काळात लोहगडाच्या सोबतीने विसापूर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्याची इतिहासात नोंद आहे. शिवरायांनी लोहगडाची डागडूजी करण्याचे आदेश दिले होते. तसेच विसापूरची डागडूजी करण्याचे आदेशही दिले असावेत अशी शक्यता आहे.
इ.स. १६६५ मध्ये पुरंदरचा तह झाला आणि स्वराज्यातील अनेक गड मुघलांच्या स्वाधीन करावे लागले. या गडांमध्ये लोहगडासह विसापूरचा सुद्धा समावेश होता. मराठ्यांनी योग्य संधीची वाट पाहत १३ मे १६७० साली दोन्ही गड पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले. त्यानंतर लोहगड मराठ्यांच्या ताब्यात होता. Visapur Fort Information In Marathi.
विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये पुढिल माहिती मिळते,
मराठे इ.स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. शहाबुद्दीन याने लोहगडावर स्वारी केली, तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो पाठलाग करत तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. मात्र, शहाबुद्दीने याने लोहगड किंवा विसापूर जिंकला होता का नाही याबद्दल ठोस माहिती उपलब्ध होत नाही. Visapur Fort Information In Marathi.
हा किल्ला इ.स. १७१३-१७२० च्या दरम्यान बाळाजी विश्वनाथ, पहिले पेशवे याच्या राजवटीत बांधला गेला. विसापूर किल्ला लोहगडापेक्षा खूप नंतर बांधला गेला पण दोन्ही किल्ल्यांचा इतिहास हा एकमेकांशी संबंधीत आहे. इ.स. १८१८ मध्ये पेशव्यांच्या साम्राज्यातील किल्ले कमी करण्यासाठी इंग्रजांनि हा किल्ला जिंक्यनासाठी त्याच्या हल्ल्याची विशेष तयारी करावी लागली. ३८० युरोपियन आणि ८०० स्थानिक सैनिकांची तुकडी, कोकणातून मागवलेली एक ट्रेन, चाकण येथील तोफखाना आणि इतर दोन ब्रिटीश बटालियनमध्ये सामील झाली.
४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. विसापूर ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्याने लोहगड सुद्धा जिंकून घेतला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना लोहगड रिकामा करायचा हूकुम सोडला अनिच्छेनेच मराठे मागे फिरले. त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. इ.स. १८८५ मध्ये, उत्तरेकडील भिंतीजवळ दहा फूट लांब एक लोखंडी तोफ होती, ज्यावर ट्यूडर रोझ आणि क्राउनने चिन्हांकित केले होते, ज्यावर ER असे अक्षरे लिहलेलली होती, ही तोफ बहुधा राणी एलिझाबेथच्या कारकिर्दीची तोफ असावी. Visapur Fort Information in Marathi.
हे पण पहा : पुरंदर किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/purandar-fort-information-in-marathi/#more-900
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडाच्या सुंदरतेमध्ये भर घालणार्या पायऱ्या गडावर जाताना एक वेगळाच अनुभव देऊन जातात. पायऱ्या सुस्थितीत असून पावसाळी वातावरणात या पायऱ्यांना नदीचे स्वरूप आलेले पहायला मिळते. गडावरील विहीर ही फार जुनी असून पांडवांनी बांधली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गडावर एक हनुमान मंदिर आहे, याचे कोरीव काम खूप सुंदर आहे जे एक लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ आहे. कोरीवकाम व्यतिरिक्त, हनुमानाला समर्पित काही मंदिरे देखील आहेत. मंदिराच्या बाजूलाच दोन गुहा लक्ष वेधून घेतात. या गुहा बऱ्यापैकी मोठ्या असून पावसाळा सोडला तर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या गुहेमध्ये ३० ते ४० जण आरामात राहू शकतात.
गडावर एक मोठं जातं असून गडाची भव्य तटबंदी पाहण्यासारखी आहे गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. विसापूरच्या किल्ल्याच्या तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहेत आणि आपल्याला १६ व्या शतकातील बांधकामाची माहिती देते. गडावर प्राचीन काळातील महादेवाचची मंदिरे आहेत. मंदिराच्या समोरच मोठा तलाव,पाण्याची टाकी आहेत. पावसाळ्यात हे दृश्य नयनरम्य असते. गडाचा विस्तार खूप मोठा आहे. त्यामुळे संपूर्ण गड पाहण्यासाठी साधारण अर्धा ते एक तास लागू शकतो. Visapur Fort Information In Marathi.
हे पण पहा : हरिहर किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/harihar-fort-information-in-marathi/#more-863
विसापूर किल्ल्याचे छायाचित्र :
विसापूर किल्ल्याकडे पोहोचण्याच्या वाटा :
पुण्याहून विसापूर किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :
१. बस : निगडी बस स्टॉप वरून तुम्हाला सिटी बस ने लोणावळा बस भेटेल.
निगडी बस स्टॉप – वडगाव – कामशेत – कार्ला फाटा (एकविरा) इथे उतरावे – इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो,कार ने विसापूर किल्ल्याला जावे लागेल. (कार्ला फाटा (एकविरा) ते विसापूर किल्ला हे अंतर ८ कि.मी. इतके आहे.)
२. रेल्वे : थेट विसापूर किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही. परंतु,
पुणे रेल्वे स्टेशन वरून लोकल रेल्वे ने माळवली रेल्वे स्टेशन ला उतरावे. नंतर इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो, कार ने जावे लागेल. (माळवली रेल्वे स्टेशन ते विसापूर किल्ला हे अंतर ६ कि.मी. इतके आहे.)
३. खाजगी वाहन : मित्रांनो, विसापूर किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
पुणे – पिंपरी चिंचवड – देहू रोड सर्कल (चौक) – जुना पुणे मुंबई महामार्ग – परंडवाडी रोड – शिवणे – कडधे ब्रिज – थुगाव – एल्से – पवनानगर – विसापूर किल्ला रोड – विसापूर.
मुंबईहून विसापूर किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :
१. बस : विसापूर किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही.(मुंबई – पुणे जुना रोडनेच जावे.)
मुंबई – खालापूर – खोपोली – जुना खंडाळा घाट – लोणावळा – माळवली – नंतर इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो, कार ने जावे लागेल. (माळवली रेल्वे स्टेशन ते विसापूर किल्ला हे अंतर ६ कि मी आहे. )
२. रेल्वे : थेट विसापूर किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही. इंद्रायणी एक्सप्रेस.
दादर रेल्वे स्टेशन – लोणावळा रेल्वे स्टेशनला उतरून तुम्हाला पुणे लोकल ट्रेन पकडावी लागणार पुढच्या मालवली रेल्वे स्टेशन साठी. माळवली रेल्वे स्टेशनला उतरावे. नंतर इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो,कार ने जावे लागेल. (माळवली रेल्वे स्टेशन ते विसापूर किल्ला हे अंतर ६ कि मी आहे.)
३. खाजगी वाहन : मित्रांनो, विसापूर किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
मुंबई – मुंबई सातारा महामार्ग – वाशी ब्रिज – वहाळ – खालापूर – खोपोली – जुना खंडाळा घाट – लोणावळा – कार्ला फाटा (एकविरा) – माळवली – भाजे घाट – विसापूर.
नाशिकहून विसापूर किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :
१. बस : विसापूर किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही.
नाशिक – सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरूनगर – चाकण – मोशी – भोसरी – पुणे. सिटी बस पकडून निगडी सिटी बस स्टॉप ला जावे. एथून तुम्हाला डायरेक्ट लोणावळा जाण्या सिटी बस भेटेल. नंतर कार्ला फाटा (एकविरा) इथे उतरावे. नंतर इथून पुढे तुम्हाला शेअरिंग ऑटो.(रिक्शा) ने जावे लागेल. (कार्ला फाटा (एकविरा) ते विसापूर किल्ला हे अंतर ८ कि.मी. इतके आहे.)
२. रेल्वे : थेट विसापूर किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही.
३. खाजगी वाहन : मित्रांनो, विसापूर किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने जाऊ शकतो,
नाशिक – सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरूनगर – चाकण – महाळुंगे इंगळे – तळेगाव दाभाडे – वडगाव – कामशेत – थुगाव रोड – रोतवाडी – करुंज मावळ – थुगाव – एल्से – पवनानगर – विसापूर किल्ला रोड – विसापूर.
हे पण पहा : मुरूड-जंजिरा किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/murud-janjira-fort-information-in-marathi/#more-824
FAQs :
१. विसापूर किल्ल्याचे दुसरे नाव काय आहे ?
– विसापूर किल्ल्याचे दुसरे नाव “संबळगड” आहे.
२. विसापूर किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची किती फूट आहे ?
– विसापूर किल्ल्याची समुद्रसपाटीपासून “उंची ३,५५६ फूट” आहे.
३. विसापूर किल्ला ऊर्फ संबळगड कोणत्या जिल्ह्यातील आहे ?
– विसापूर किल्ला ऊर्फ संबळगड “पुणे” जिल्ह्यातील आहे.
४. विसापूर किल्ल्या जवळ कोणता किल्ला आहे ?
– विसापूर किल्ल्या जवळ लोहगड किल्ला आहे.
हे पण पहा : हरिश्चंद्रगड किल्ल्याची माहिती मराठीत. https://marathimavla.com/harishchandragad-fort-information-in-marathi/#more-702
Hostinger Is Best Website For Buy Domain For Your Website. https://www.hostinger.in